मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्य सरकारचा प्रस्तावित जनसुरक्षा कायदा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरोधात आहे, असा आरोप करत या कायद्याविरोधात राज्यातील पत्रकार संघटनांनी गुरुवारी (३ एप्रिल) तीव्र निदर्शने केली. या कायद्याला विरोध दर्शवला. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या माध्यमातून निदर्शने करण्यात आली.(Journalists protest)
हा कायदा माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचा आरोप यावेळी सर्व पत्रकारांनी केला. तो त्वरित तो मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा यापुढील आंदोलन तीव्र करू असा इशाराही यावेळी देण्यात आला. (Journalists protest)
आझाद मैदान जवळ असलेल्या पत्रकार संघाच्या आवारातून रॅली काढत पत्रकारांनी निषेध व्यक्त केला. आपली भूमिका मांडली. मुंबई मराठी पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद, मुंबई प्रेस क्लब, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन, पुणे श्रमिक पत्रकार संघ, बृहन्मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ, मुंबई क्राईम रिपोर्टर असोसिएशन, मुंबई हिंदी पत्रकार संघ यांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Journalists protest)
पत्रकारांच्या स्वातंत्र्याची मुस्कटदाबी आम्हाला मान्य नाही!, असे सांगत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण म्हणाले, सरकारने अशी मनमानी करू नये. तर एस एम देशमुख यांनी, पत्रकार संरक्षण कायदा व्हावा म्हणून जशी आम्ही आंदोलन केली तशी पुन्हा होऊ नयेत यासाठी आम्हाला भाग पाडू नका’, असा इशारा दिला.
जेष्ठ पत्रकार महेश म्हात्रे म्हणाले, सरकार विरोधात पडलेली ही आंदोलनाची ठिणगी भडका होण्याअगोदर सरकारने गांभीर्याने विचार करावा. जेष्ठ पत्रकार किरण नाईक म्हणाले, आता आम्ही मागे हटणार नाही, तर जेष्ठ पत्रकार दिलीप सपाटे म्हणाले, हे विधेयक पत्रकार विरोधी असल्याने तीव्र विरोध करावा लागेल.
हेही वाचा :
फाइल्स आधी शिंदेंकडे मग फडणवीसांकडे