वॉशिंग्टन : अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले. शांततेचा नोबेल सन्मान जाहीर झालेल्या या नेत्याचे राजकीय मुत्सद्देगिरीपलीकडे भारताशी अनोखे नाते होते. १९७८ मध्ये त्यांनी भारताला दिलेली ऐतिहासिक ठरली. त्यांच्या सन्मानार्थ हरियाणातील एका गावाचे नामकरण ‘कार्टरपुरी’ असे करण्यात आले होते. आणीबाणीनंतर १९७७ मध्ये जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. त्या काळात भारताला भेट देणारे ते पहिले अमेरिकन नेते होते. २ जानेवारी १९७८ रोजी त्यांनी भारतीय संसदेत भाषण् केले. त्यावेळी त्यांनी हुकूमशाहीला तीव्र विरोध करत लोकशाही आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. (Jimmy Carter)
‘विकासनशील देशाने आर्थिक आणि सामाजिक प्रगती साधण्यासाठी हुकूमशाही किंवा निरंकुश शासन स्वीकारले पाहिजे, हा सिद्धांत भारताने खोडून काढला आहे,’ असे कार्टर म्हणाले होते.
त्यांनी भारताच्या निवडणूक लोकशाहीचे कौतुक केले होते. ‘जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशातील मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून आपले नेते मुक्त वातावरणात आणि हुशारीने निवडले. त्यात लोकशाहीचाच विजय झाला,’ असे गौरवोद्गार त्यांनी काढले होते.(Jimmy Carter)
त्यानंतर दुसऱ्या दिवशी, कार्टर आणि तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी दिल्ली करारावर सह्या करून दोन्ही राष्ट्रांमधील संबंध दृढ केले. राष्ट्रपती भवनात बोलताना कार्टर यांनी लोकशाही आणि मानवी हक्कांची मूल्ये अधोरेखित केली. भारत आणि अमेरिकन सरकार नागरिकांच्या सेवेत रुजलेले आहे, ते इतर कशांतही नाही.(Jimmy Carter)
दिल्लीजवळील दौलतपूर नसीराबाद या गावाला कार्टर यांनी पत्नी रोझलिन यांच्यासह भेट दिली. या भेटीने कार्टर यांचे भारताशी संबंध अधिकच दृढ झाले. गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळीच गावकऱ्यांनी गावाचे नामकरण ‘कार्टरपुरी’ असे केले. कार्टर आणि गावातील बंध टिकून राहिले. २००२ मध्ये कार्टर यांना शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले तेव्हा येथील रहिवाशांनी आनंदोत्सव साजरा केला. ३ जानेवारीला स्थानिक सुट्टीही जाहीर करण्यात आली.
कार्टर यांची ही भेट प्रतीकात्मकतेच्याही पलीकडे होती. कार्टर यांच्या आई लिलियन कार्टर यांनी १९६० च्या दशकात पीस कॉर्प्स स्वयंसेवक म्हणून भारतात काम केले होते. त्यामुळे त्यांचे भारताशी असलेले संबंध अत्यंत व्यक्तिगत जिव्हाळ्याचे होते. या भेटीने भारत-अमेरिकेदरम्यानच्या चिरस्थायी भागीदारीचा पाया घातला. रस्पर आदर आणि सामायिक आदर्श ही त्याची मूल्ये आहेत, असे कार्टर सेंटरने म्हटले होते. प
कार्टर यांचा कार्यकाल
कार्टर यांनी १९७७ ते १९८१ या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषवले. शीतयुद्धातील तणाव, अस्थिर तेल बाजार आणि नागरी हक्क आणि लैंगिक समानतेसाठी देशांतर्गत संघर्ष असा हा काळ होता. त्यांच्याच काळात १९७८ च्या कॅम्प डेव्हिड ॲकॉर्ड्समध्ये केलेली शिष्टाई आणि त्यातून इजिप्त आणि इस्रायल यांच्यात झालेला शांतता करार ही त्यांची सर्वात उल्लेखनीय कामगिरी होती. इराणी बंधकांचे संकट आणि आर्थिक उलथापालथ यांसारखी आव्हाने असूनही, कार्टर यांचा राष्ट्राध्यक्षपदानंतरचा वारसा मानवतावादी प्रयत्नांतून भरभराटीला आला. त्यामुळे त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
हेही वाचा :
विमान क्रॅश; १७९ प्रवासी ठार
मंगळ दहा हजारपटीने चमकणार