Home » Blog » Jarange on Nagpur: सरकार, फडणवीस पुरस्कृत दंगल

Jarange on Nagpur: सरकार, फडणवीस पुरस्कृत दंगल

मनोज जरांगे यांचा थेट आरोप

by प्रतिनिधी
0 comments
Jarange on Nagpur

नागपूर : इथल्या मुसलमान लोकांना कबरीचे प्रेम असणे गरजेचे नाही. नागपूरची दंगल सरकार आणि फडणवीस पुरस्कृत आहे, असा थेट आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. (Jarange on Nagpur)

वेरूळमध्ये मालोजी राजांची गढी आहे. तेथे मंगळवारी (१८ मार्च) शहाजीराजे भोसले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी  शहाजीराजे भोसले यांना मानवंदना अर्पण करण्यात आली. जरांगे पाटील आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी नागपूरमधील हिंसाचारावर भाष्य करताना थेट फडणवीस आणि राज्य सरकारला जबाबदार धरले. (Jarange on Nagpur)

निवडणुका आल्या की वाद उकरून काढला जातो, त्यामुळे समाजाने सावध राहणे गरजेचे आहे. हे सगळे कावे आहेत. कबर इथे दंगल मात्र नागपूरला घडते. सरकार यांचेच आहे. तेच या कबरीसाठी पैसे देतात. मग तुम्हाल कबर काढण्यात काय अडचण आहे, असा सवाल करून जरांगे म्हणाले, इथल्या मुसलमान लोकांना कबरीचे प्रेम असण्याचे कारण नाही. ही दंगल सरकार, फडणवीस पुरस्कृत आहे. यांना तो प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर दिसत नाही का? तेथे त्यांचे हिंदुत्व जागे होत नाही का, असा सवालही जरांगे यांनी केला. (Jarange on Nagpur)

गरीबांना झुंजवत ठेवू नका

सरकार तुमचे आहे तुम्हाला कबर काढायची तर काढू शकता, पण गोरगरिब जनतेला परस्परांत झुंजवत ठेवू नका, असे आवाहन जरांगे यांनी केले. ते म्हणाले, किंबहुना मुस्लिम जनतेला माझे आवाहन आहे की, कबरीवर प्रेम करू नका. या सरकारने मराठा आरक्षण दिले नाही. तेलंगणाने ४२ टक्के ओबीसी आरक्षण दिले, पण महाराष्ट्राचे हे सरकार करणार नाही. फडणवीस असे करणार नाहीत. त्यामुळे लोकांनी शांत राहावे आणि पोटापाण्याचे काम करावे. (Jarange on Nagpur)

निवडणूक तोंडावर आली हे असले प्रकार करतात. लोकांना वेडे बनवण्याचा त्यांचा उद्योग आहेत. सरकारचे लोक म्हणतात कबर हटाव. मात्र यामुळे गोरगरिबांना हे अडचणीत आणतात. मराठा आरक्षण दिले नाही. सरकारने आश्वासन दिले. मात्र ते ते पूर्ण करत नाही, अशी टीकाही जरांगे यांनी केली.

हेही वाचा :
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही
शिवाजी विद्यापीठ हेच प्रचलित नाव ठेवा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00