Home » Blog » Jaishankar :परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यावर लंडनमध्ये हल्ल्याचा प्रयत्न

Jaishankar :परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यावर लंडनमध्ये हल्ल्याचा प्रयत्न

खलिस्तान समर्थकांचा तिरंगा फाडण्याचा प्रयत्न

by प्रतिनिधी
0 comments
Jaishankar

नवी दिल्ली : प्रतिनिधी : ब्रिटनची राजधानी लंडन येथे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. खलिस्तान समर्थकांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र लंडन पोलिसांनी हल्लेखोरांचा हा डाव उधळून लावत खलिस्तानी समर्थकांनी ताब्यात घेतले. यावेळी खलिस्तान समर्थकांनी घोषणाबाजी करत तिरंगा फाडण्याचाही प्रयत्न केला. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून संताप व्यक्त केला जात आहे. भारताने या घटनेबद्दल ब्रिटन सरकारकडे प्रश्न उपस्थित केला असून निषेध नोंदवला आहे. (Jaishankar)

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ब्रिटन आणि आयर्लंडच्या सहा दिवसीय दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान कीम स्टार्मर आणि परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांची भेट घेतली. त्यानंतर ते लंडनच्या थिंक टँक चॅथम हाऊस येथे ‘हिंदुस्थानचा उदय आणि जागतिक स्तरावरील भूमिका’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी पोहोचले. या वेळी तिथे खलिस्तान समर्थक जमा झाले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. (Jaishankar)

खलिस्तान समर्थकांनी भारतविरोधी घोषणा दिल्या. परराष्ट्रमंत्री जयशंकर चॅथम हाऊसबाहेर पडल्यानंतर खलिस्तान समर्थकांनी अक्राळस्तनेपणा दाखवला आणि त्यांनी परराष्ट्र मंत्र्यांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. एक खलिस्तानी समर्थक जयशंकर यांच्या गाडीसमोर आला आणि त्याने हातातील तिरंगा फाडण्याचा प्रयत्न केला. मात्र चॅथम हाऊसबाहेर उपस्थित पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखले आणि गाडीपासून दूर नेले. यावेळी खलिस्थान समर्थकांनी घोषणाबाजी केली. या घटनेनंतरही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा दौरा सुरू आहे. ते ब्रिटन आणि आयर्लंड देशाबरोबर व्दिपक्षीय चर्चा सुरू आहे.(Jaishankar)

हेही वाचा :

अमेरिकेपुढे चीन कदापि झुकणार नाही

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00