Home » Blog » Jagnnath patil speech: निसर्ग संवर्धनासाठी संवादक बना

Jagnnath patil speech: निसर्ग संवर्धनासाठी संवादक बना

डॉ. जगन्नाथ पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

by प्रतिनिधी
0 comments
Jagnnath patil speech

कोल्हापूर : प्रतिनिधी : ‘सारे जग सध्या पर्यावरण आणीबाणीच्या कालखंडातून जात आहे. शिक्षण घेणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी ही देशाची पुढची पिढी आहे. या पिढीने निसर्गाच्या संवर्धनासाठी संवादक बनून काम करणे गरजेचे आहे,’ असे मत जागतिक शिक्षणतज्ज्ञ आणि शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केले.(Jagnnath patil speech)

राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात २९ जानेवारी हा दिवस ‘पृथ्वी संरक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या. यावेळी ते बोलत होते.

डॉ. पाटील म्हणाले,  ‘जगात मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास सुरु आहे. हे वेळीच थांबविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सर्व विद्यार्थिनींनी काही झाडे लावल्यास आणि पर्यावरणविषयक जागृतीचे काम समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचवल्यास येत्या काही वर्षांमध्ये लाखो झाडे निर्माण करू शकू, ज्यातून तापमान वाढ आणि इतर गोष्टींना आळा बसेल.’ (Jagnnath patil speech)

या वेळी प्रत्येक विद्यार्थिनीला रोप भेट देण्यात आले. ते रोप प्रत्यकाने आपल्या घराजवळ किंवा शेतामध्ये लावण्याचा संकल्प केला.  तसेच ‘धरती मातेची सुरक्षा आणि संवर्धन’ याची शपथ घेतली. गेल्या पाच वर्षात शहीद शिक्षण प्रसारक मंडळाने २५ हजारहून अधिक झाडे लावून  जोपासली आहेत.

यावेळी शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रशांत पालकर, शहीद सिताराम कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्या प्रा. स्नेहल माळी, शहीद सिताराम पाटील कॉलेज ऑफ  पी. जी.च्या प्राचार्या प्रा. सिद्धता गौड, शहीद सिताराम कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या मनाली भंडारी, शहीद पब्लिक स्कूलच्या प्राचार्या शिल्पा अरबुने उपस्थित होत्या.

हेही वाचा :

‘इस्रो’चे शतक !

पानसरे हत्येतील सहा आरोपींना जामीन

लंडनच्या दुप्पट आकाराचा हिमखंड!

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00