Home » Blog » Jagdip Dhankad : उपराष्ट्रपती धनखड हॉस्पिटलमध्ये दाखल

Jagdip Dhankad : उपराष्ट्रपती धनखड हॉस्पिटलमध्ये दाखल

दिल्लीतील एम्स मध्ये उपचार

by प्रतिनिधी
0 comments
Jagdip Dhankad

नवी दिल्ली : प्रतिनिधी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावल्याने दिल्लीतील एम्समध्ये त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. काल रात्री दोन वाजता त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. (Jagdip Dhankad)

शनिवारी रात्री झोपताना त्यांना अस्वस्थता जाणवली. छातीत दुखायला लागल्यावर त्यांना दिल्लीतील एम्स मध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. एम्सच्या कार्डियोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राजीव नारंग यांच्या देखरेखीखाली क्रिटिकल युनिलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तिथे त्यांना स्टेंट टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. (Jagdip Dhankad)

एएनआयने हॉस्पिटलच्या सुत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना सकाळी सकाळी एम्स दिल्लीतील कार्डियक विभागात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Jagdip Dhankad)

हेही वाचा :

मणिपुरात संघर्ष उफाळला; निदर्शकाचा मृत्यू

हम्पीमध्ये परदेशी पर्यटक महिलेवर अत्याचार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00