Home » Blog » Jabalpur Accident: महाकुंभहून परतताना गोकाकचे सहा भाविक ठार

Jabalpur Accident: महाकुंभहून परतताना गोकाकचे सहा भाविक ठार

जबलपूरजवळ वाहन दुभाजकाला धडकून बसवर आदळले

by प्रतिनिधी
0 comments
Jabalpur Accident

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात सोमवारी एका बसला चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत गोकाक (जि. बेळगाव) येथील सहा भाविकांचा मृत्यू झाला. अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास सिहोरा तालुक्यातील पहरेवा गावाजवळ घडली. हे सर्वजण प्रयागराजमध्ये महाकुंभला भेट देऊन परतत होते. (Jabalpur Accident)

भालचंद्र नारायण गौडर (वय ५०) सुनील बाळकृष्ण शेडशाळ (४५), बसवराज निरपादप्पा कुर्ती (६३), बसवराज शिवाप्पा दोडमणी आणि वीरूपाक्ष चन्नाप्पा गुमती (वय ४९, सर्व, रा.  गोकाक) आणि इराण्णा शंकराप्पा शेबिनकट्टी (२७, रा. गुळेदगुड्ड) अशी मृतांची नावे आहेत. गंभीर जखमींमध्ये मुस्ताक (सिंधी कुरबेट) व सदाशिव केदारी (उपलाळी) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोकाकहून प्रयागराजला गेलेले हे भाविक त्यांच्या वाहनातून (केए ४९ एम ५०५४) महाकुंभहून परतत येते. जबलपूरजवळ सिहोराजवळ तुफान वेगाने आलेले हे वाहन दुभाजकावर धडकले. ते विरूद्ध बाजूने येणाऱ्या बस (एमएच ४० सीएम ४५७९) वर आदळले. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी झाले आहेत. (Jabalpur Accident)

जखमींना उपचारांसाठी जबलपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे.

कर्नाटकातील हे भाविक जीपने उत्तर प्रदेशातील प्रयागराजला आले होते. तेथून परतत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ते बसवर आदळले, अशी माहिती जबलपूरचे जिल्हाधिकारी दीपक सक्सेना यांनी दिली. (Jabalpur Accident)

परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. सोबत सिहोरा-खितोला पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.

याआधी, ११ फेब्रुवारी रोजी एनएच-७ वर ट्रॅव्हलर वाहनाची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात आंध्र प्रदेशातील आठ भाविकांचा मृत्यू झाला होता. गेल्या १० दिवसांत ९ वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण २६ भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रातील तिघांचा मृत्यू

दरम्यान, महाकुंभहूहन परतत असताना झालेल्या आणखी एका अपघातात महाराष्ट्रातील तिघांचा मृत्यू झाला. यात दोन महिलांचा समावेश आहे. मध्य प्रदेशातील मौगंज जिल्ह्यात रविवारी पहाटे कारची ट्रकला धडक बसून ही भीषण घटना घडली. लाऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवतलाबजवळ रविवारी पहाटे ४ च्या सुमारास हा अपघात झाला. (Jabalpur Accident)

राकेश परदेशी (वय ४०), सरिता परदेशी (५३) आणि अंजना चौरसिया (५२, सर्व रा. महाराष्ट्र) अशी मृतांची नावे आहेत.

अन्य दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लाऊर पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल सुरेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश परदेशी आणि सरिता परदेशी यांचा जागीच मृत्यू झाला, तर अंजना चौरसिया यांना मौगंज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथून त्यांना रेवाच्या संजय गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. (Jabalpur Accident)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालकाचे नियंत्रण सुटले. ती दुभाजकावर आदळून विरुद्ध बाजूला गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली.

हेही वाचा :

माझा जन्म जैविक नाही म्हणतो त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा?

 तोंडात बोळा कोंबून महिलेचा खून?

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00