Home » Blog » IT Notice: सफाई कर्मचाऱ्याला ३४ कोटीची नोटीस

IT Notice: सफाई कर्मचाऱ्याला ३४ कोटीची नोटीस

आयकर विभागाची धावाधाव

by प्रतिनिधी
0 comments
IT Notice

आग्रा : उत्तर प्रदेशातील अलिगडमधील एका ज्यूस विक्रेत्याला आणि एका कारखान्यातील कामगाराला अनुक्रमे ७.८ कोटी आणि ११ कोटी रुपयांच्या आयकर (आय-टी) नोटिसा मिळाल्याच्या धक्कादायक बातम्यांची चर्चा गेली अनेक दिवस होती. आता त्याहूनही धक्कादायक बातमी आली आहे. ती आहे १५,००० रुपये मासिक कमाई असणाऱ्या एका सफाई कर्मचाऱ्याला ३४ कोटी रुपयांची नोटीस मिळाल्याची. या नोटिसीने या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाच्या तोंडचे पाणीच पळाले! (IT Notice)

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने हे वृत्त दिले. आयकर विभागाने २२ मार्च रोजी जारी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की  रेकॉर्डनुसार, करदात्या करण कुमारनी २०१९-२० च्या मूल्यांकन वर्षासाठी आयकर परतफेड दाखल केलेली नाही. रेकॉर्ड/सिस्टमनुसार… करदात्याचे २०१९-२० साठीचे उत्पन्न ३३,८५,८५,३६८ रुपये आहे…” (IT Notice)

यासंदर्भात बोलताना, ३४ वर्षीय करण कुमार म्हणाले की त्यांना २९ मार्च रोजी आयकर भरण्यासंबंधी नोटीस मिळाली. सुरुवातीला त्यांना नोटिसमधील मजकूर समजला नाही. काही लोकांशी सल्लामसलत केल्यानंतर त्यांना नोटिसीतील तपशील समजला. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला.

ते सांगतात, ‘‘मी शहरातील खैर भागातील एसबीआय शाखेत स्वच्छता कर्मचारी आहे. माझे मासिक उत्पन्न १५,००० रुपये आहे. मी २०२१ पासून कंत्राटी पद्धतीने हे काम करत आहे. मंगळवारी मी चांदौस पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (IT Notice)

करणने दावा केला की त्यांच्या पॅन कार्डचा कोणीतरी गैरवापर करत आहे. तो म्हणाला की २०१९ मध्ये तो नोएडा येथील एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. या काळात व्यवस्थापनाने त्याच्या पॅन कार्डसह काही कागदपत्रे मागितली. ती त्याने सादर केली होती.(IT Notice) दरम्यान, अलीगडमध्ये कार्यरत आय-टी अधिकारी नैन सिंग यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “आमच्या सिस्टममध्ये नोंदणीकृत असलेल्या त्यांच्या पॅन कार्डमध्ये जास्त उत्पन्न दिसून आले. त्यामुळेच नोटिसा जारी करण्यात आल्या. मला या प्रकरणांची माहिती आहे. आम्ही ही सर्व प्रकरणे फेसलेस आय-टी मूल्यांकनात टाकू. जर आम्हाला त्यांच्या पॅन कार्डचा गैरवापर झाला असल्याचे आढळले तर तर आम्ही चौकशी आणि योग्य ती कार्यवाही करू.”

हेही वाचा :
‘कुंभ’मधील मृत्यू लपविण्यासाठी वक्फ विधेयक
इतिहास भाजपपेक्षा नितीश कुमारना जास्त दोषी ठरवेल

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00