Home » Blog » IPL so far : पहिल्या आठवड्यातच घणाघात

IPL so far : पहिल्या आठवड्यातच घणाघात

सुरुवातीच्या पाच सामन्यांमध्ये पूर्वीचे विक्रम चक्काचूर

by प्रतिनिधी
0 comments
IPL so far

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेटचा नवा मोसम पहिल्या आठवड्यामध्येच लक्षवेधी ठरतो आहे. या मोसमातील अद्याप केवळ पाच सामनेच झाले असले, तरी या सामन्यांमध्ये बरेच विक्रम मोडीत निघाले आहेत. त्याचप्रमाणे, धावगती, तसेच चौकार व षटकारांच्या सरासरीतही यंदाच्या मोसमाने अगोदरच्या मोसमांना मागे टाकले आहे. (IPL so far)

  • १०.३७ : यंदाच्या आयपीएलमधील आतापर्यंतची सरासरी धावगती. आयपीएलच्या आतापर्यंतच्या मोसमांमध्ये प्रथमच डावातील सरासरी धावगती १० पेक्षा अधिक आहे.
  • ३.९ : या आयपीएलमध्ये सरासरी दर ३.९ चेंडूंना एक चौकार लगावण्यात येत आहे. २०२४ च्या मोसमात ही सरासरी ५.३ चेंडू इतकी होती. (IPL so far)
  • ९.९ : या आयपीएलमध्ये प्रत्येक षटकारामागील चेंडूची सरासरी ९.९ इतकी आहे. २०२४ च्या मोसमात सरासरी दर १३.७ चेंडूंना षटकार खेचण्यात आला होता.
  • १७% : यंदाच्या पहिल्या पाच सामन्यांमध्ये एकूण धावगतीमध्ये १७ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर, चौकारांचे प्रमाण ३४ टक्क्यांनी, तर षटकारांचे प्रमाण ३७ टक्क्यांनी वाढले आहे. या मोसमात आतापर्यंत ११९ षटकारांची, तर १४६ चौकारांची बरसात झाली आहे. मागील मोसमातील हीच संख्या अनुक्रमे ८७ आणि १३६ अशी होती. (IPL so far)
  • २०० : मागील मोसमामध्ये पहिल्या पाच सामन्यांत केवळ दोन संघांना २०० धावांचा टप्पा ओलांडता आला होता. कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांच्या धावसंख्या त्यावेळी २१० च्या आतमध्ये होत्या. यावेळी, आतापर्यंतच्या दहा डावांमध्ये सहावेळा २०० धावांचा टप्पा पार झाला असून त्यापैकी चारवेळा २३० धावांहून अधिक धावसंख्या उभारण्यात आली.
  • ११.३५ : यंदाच्या मोसमात पॉवर-प्लेमध्ये ११.३५ च्या धावगतीने धावा जमवण्यात आल्या. मागील मोसमात ही धावगती ८.७६ इतकी होती. आतापर्यंतच्या दहापैकी आठ डावांत पॉवर-प्लेमध्ये ६० धावांचा टप्पा ओलांडण्यात आला आहे. डेथ ओव्हर्समध्ये (अखेरची ५ षटके) यंदाच्या मोसमातील धावगती १२.६२ इतकी असून ती मागील मोसमापेक्षा (१२.०२) ०.६ ने अधिक आहे. (IPL so far)

    हेही वाचा :
    भारताला कुस्तीत दोन ब्राँझ
    अग्रमानांकित झ्वेरेवला पराभवाचा धक्का

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00