Home » Blog » Indrajeet slams : ‘चिल्लर’ कोरटकर कसा सापडत नाही?

Indrajeet slams : ‘चिल्लर’ कोरटकर कसा सापडत नाही?

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा सवाल

by प्रतिनिधी
0 comments
Indrajeet slams

कोल्हापूर : प्रतिनिधी : राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारा ‘चिल्लर’ माणूस प्रशांत कोरटकर कसा सापडत नाही, असा खोचक सवाल इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. सावंत यांनी आज जुना राजवाडा पोलिस ठाण्यात मोबाईलमधील डाटा इरेझ केल्याबद्दल कोरटकर विरोधातील गुन्ह्यात २४१ बीएनएस हे कलम वाढवावे, अशा मागणीचा अर्ज आज गुरुवारी दिला. त्यानंतर २४१ बीएनएस कलम गुन्ह्यात वाढवण्यात आले आहे, असे जुना राजवाडा पोलिसांनी सांगितले.

इतिहास संशोधक सावंत यांनी कोरटकर यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलिसांना अर्ज दिला आहे. अर्जात असे म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक नीच वक्तव्य व जातीमध्ये व्देष निर्माण करणारे संभाषण यामुळे प्रशांत कोरटकर या तथाकथित पत्रकाराविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात असंतोषाचे वातावरण आहे. संशयित कोरटकर अजूनही फरार आहे. आणि कोरटकर याचा मोबाईल फोन जो गुन्ह्यातील महत्वाचा पुरावा आहे. तो फॉरमॅट करुन, त्यातील डेटा इरेज करुन प्रशांत कोरटकरने अतिरिक्त गुन्हा केलेला आहे. माझे वकील असिम सरोदे यांनी न्यायालयात युक्तीवाद करताना हे स्पष्ट सांगितले आहे की पुरावा नष्ट करण्याबद्दल वाढीव कलम २४१बीएनएस हे कलम लावणे कायद्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे असे अर्जात म्हटले आहे. अर्जावर इंद्रजीत सावंत, वकील हेमा काटकर, वकील पल्लवी थोरात, वकील योगेश सावंत यांच्या सह्या आहेत. सावंत यांच्या अर्जानंतर पोलिसांनी २४१ बीएनएस हे कलम गुन्ह्यात वाढवले आहे.  

अर्ज दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना इतिहास संशोधक सावंत म्हणाले, न्यायालयाने कोरटकर याचा जामिन अर्ज फेटाळला आहे. तो पळापळी करत आहेत. त्याला त्वरीत अटक करावे. कोल्हापूरातील जुना राजवाडा पोलिसांच्या तपासाविषयी मी समाधानी आहे. पण चिल्लर माणूस कसा सापडत नाही याची शंका येते.

दरम्यान कोरटकर यांना अटक करण्यासाठी जुना राजवाडा पोलिसांचे एक उपनिरीक्षक आणि चार पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक नागपूरला गेले आहे.  दोन दिवस कोरटकरांचा शोध घेत आहेत. पण अद्याप त्यांचा ठावठिकाणा मिळालेला नाही. कोल्हापूर जिल्हा न्यायालयातील निर्णयाच्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागून कोरटकर जामिनसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती पुढे आली आहे.

हेही वाचा :

शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’

शेतातच समजणार रोगाचा प्रादुर्भाव

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00