Home » Blog » India’s Aid for Myanmar: भारताकडून म्यानमारला आणखी ४० टन मदत साहित्य

India’s Aid for Myanmar: भारताकडून म्यानमारला आणखी ४० टन मदत साहित्य

भूकंपग्रस्तांना दिलासा; तात्पुरते हॉस्पिटलही उभारणार

by प्रतिनिधी
0 comments
India's Aid for Myanmar

नवी दिल्ली : भारताने भूकंपग्रस्त म्यानमारला आणखी ४० टनांहून अधिक मदत साहित्य पाठवले. ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत आपले प्रयत्न गतिमान केले आहेत. ४० टन मदत घेऊन जाणारी आयएनएस सातपुरा आणि आयएनएस सावित्री ही दोन भारतीय नौदल जहाजे यांगून बंदरात रवाना करण्यात आली आहेत. (India’s Aid for Myanmar)

याव्यतिरिक्त, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह ११८ कर्मचाऱ्यांसह एक फील्ड हॉस्पिटल रात्री आग्रा येथून विमानाने आणले जाणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने तंबू, ब्लँकेट, अन्न पॅकेट्स आणि आवश्यक औषधे यासह मदत साहित्याचा पहिला टप्पा हवाई मार्गाने यांगूनला पोहोचवण्यात आला. (India’s Aid for Myanmar)

मदत घेऊन जाणारे भारताचे पहिले विमान पोहोचले

म्यानमारला मदत घेऊन जाणारे भारताचे पहिले विमान म्यानमारच्या नेपिडो येथे उतरले आहे. या विमानात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची टीम देखील आहे. भारतीय राजदूत आणि म्यानमारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे राजदूत माउंग माउंग लिन यांनी या पथकाचे स्वागत केले. भूकंपानंतर विमानतळ अंशतः बंद असूनही, राजधानीत बचाव पथके पाठवणारा भारत हा पहिला देश आहे.एनडीआरएफ टीम उद्या सकाळी मंडालेला रवाना होईल. त्यामुळे तेथे ऑपरेशनसाठी पोहोचणारी ही पहिली बचाव पथक ठरेल. (India’s Aid for Myanmar)

मृतांचा आकडा वाढण्याची भीती
म्यानमार आणि थायलंडमध्ये शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बँकॉकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, जिथे बांधकाम सुरू असलेली उंच इमारत कोसळल्याने किमान आठ जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले. पोलिसांनी सांगितले की १०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. थायलंडचे पंतप्रधान पेटोंगटार्न शिनावात्रा यांनी बँकॉकला ‘आणीबाणी क्षेत्र’ म्हणून घोषित केले. त्यांच्या कार्यालयातून आलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान शिनावात्रा यांनी “तात्काळ गृह मंत्रालयाला बँकॉकला आपत्कालीन क्षेत्र घोषित करण्याचे आणि देशभरातील प्रांतांना परिस्थिती राष्ट्रीय आणीबाणी म्हणून हाताळण्यास सूचित करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून गरज पडल्यास त्वरित सार्वजनिक मदत मिळू शकेल.
शुक्रवारी, म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात किमान १,६४४ लोक ठार आणि अडीचहजारावर जखमी झाले आहेत. तथापि, मृतांचा आकडा वाढण्याची आणि तो २,००० पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

हेही वाचा :
 म्यानमारमधील मृतांचा आकडा १,६४४

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00