Home » Blog » Indian deported : अमेरिकेतून शंभरावर भारतीयांची पाठवणी

Indian deported : अमेरिकेतून शंभरावर भारतीयांची पाठवणी

मोदींचा अमेरिका दौरा तोंडावर असतानाच पाऊल

by प्रतिनिधी
0 comments
Indian deported

वॉशिंग्टन/अमृतसर : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यात अनेक भारतीयांचाही समावेश आहे. १२ ते १३ फेब्रुवारी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वॉशिंग्टन दौरा नियोजित असतानाच अमेरिकेने ही कारवाई केली आहे.(Indian deported)

बुधवारी (दि. ५ फेब्रुवारी) शंभरहून अधिक निर्वासित भारतीय स्थलांतरितांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान अमृतसरच्या श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. हे विमान सकाळी लवकर उतरणे अपेक्षित होते. अमेरिकेतून हद्दपार झालेल्यांमध्ये ३३ गुजरातचे आहेत, तर ३० पंजाबचे आहेत.

यावेळी विमानतळ परिसरात मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. त्यामुळे विमानतळावर सुरक्षा उपाय वाढवण्यात आले. (Indian deported)

हद्दपार केलेल्या व्यक्तींमध्ये २५ महिला, १२ अल्पवयीन आणि ७९ पुरुषांचा समावेश आहे. निर्वासित भारतीय नागरिकांव्यतिरिक्त, विमानात ११ क्रू मेंबर आणि ४५ यूएस अधिकारी आहेत. पंजाब व्यतिरिक्त हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील नागरिकांचाही यात समावेश आहे. हद्दपार झालेल्यांमध्ये ३३ गुजरातचे आहेत, तर ३० पंजाबचे आहेत. प्रत्येकी दोन निर्वासित उत्तर प्रदेश आणि चंदीगडमधील आहेत, तर तीन महाराष्ट्रातील आहेत. (Indian deported)

विशेष बंदोबस्त

पंजाब पोलिसांनी विमानतळावर सुरक्षा वाढवली आहे. पंजाब सरकारने राज्यातील लोकांना त्यांच्या ठिकाणी परत नेण्यासाठी मिनी बसेसची व्यवस्था केल्याची माहिती आहे. या नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिले.

पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी सांगितले की, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निर्वासितांचे स्वागत मैत्रीपूर्ण पद्धतीने करण्याचा आणि मदतीसाठी विमानतळावर काउंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य पोलीस केंद्र सरकारच्या सतत संपर्कात आहेत. अमेरिकेतून हद्दपार झालेल्यांचे भूतकाळातील कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे की त्याची पडताळणी केली जाईल. (Indian deported)

ट्रम्प प्रशासनाकडून लोकांना हद्दपार करण्यात येत आहे. आतापर्यंत पाठवणी केलेल्या नागरिकांपैकी लष्करी विमाने पाठवण्यात येणारा भारत सर्वात दूरचा देश ठरला आहे.

अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्याने निर्वासन फ्लाइटचा तपशील देण्यास नकार दिला. अमेरिका आपल्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करत आहे. इमिग्रेशन कायदे कडक करत आहे आणि बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठवण्यात येत असल्याचे त्याने सांगितले.

हेही वाचा :

पंतप्रधान मोदींची गंगेत डुबकी
प्राध्यापिकेने बांधली विद्यार्थ्यांशी लग्नगाठ!
दिल्लीसाठी १३ हजारावर केंद्रांवर मतदान

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00