नवी दिल्ली : भारत आणि चीन या देशांमध्ये मंगळवारी बीजिंग येथे राजनैतिक स्तरावरील चर्चेची फेरी पार पडली. ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. दोन्ही देशांमधील सुरू असल्याचा सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. (India-China)
परराष्ट्र मंत्रालयाने पत्रक प्रसिद्ध करून या बैठकीची माहिती दिली. या बैठकीसाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व मंत्रालयातील पूर्व आशिया विभागाचे सहसचिव गौरांगलाल दास यांनी केले. हाँग लिआंग यांनी चीनच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. दोन्ही देशांदरम्यान सीमाप्रश्नावर झालेली ही ३३ वी राजनैतिक बैठक होती. बैठकीमध्ये भारत व चीनदरम्यान सध्या प्रत्यक्ष ताबारेषेजवळ असलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सीमेवरील शांतता ही द्विपक्षीय संबंध आणि प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे, सीमेवर योग्य व्यवस्थापन करण्यासंबंधी विविध उपाययोजना आणि प्रस्ताव बैठकीत चर्चिण्यात आले. (India-China)
या वर्षीच भारतामध्ये दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यावरही यावेळी सहमती झाली. कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणे, दोन्ही देशांमधून वाहणाऱ्या नद्यांचे जलव्यवस्थापन, सीमामार्गाने होणाऱ्या आयात-निर्यातीसंदर्भातील परस्परसहकार्य आदी मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली. या वर्षी २६-२७ जानेवारी रोजी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बीजिंगचा दौरा केला होता. यावेळी चीनच्या परराष्ट्र सचिवांशी त्यांनी केलेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी २०२५ च्या उन्हाळ्यापासून कैलास-मानसरोवर यात्रा पूर्ववत करण्याची घोषणा केली होती. (India-China)
हेही वाचा :
दारुच्या बाटलीवर, बाटली फ्री