महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : अंडर -१९ आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगला देशने भारताला पराभवाची धूळ चारली. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत बांगला देशने भारताला विजयासाठी १९९ धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव १३९ धावांमध्ये गुंडाळला. गोलंदाजीत बांगलादेशचा कर्णधार अझीझुल हाकीम तमिम आणि इक्बाल हुसैन यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेत भारतीय संघाला अडचणीत आणले. या दोघांशिवाय अल फहाद याने दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. अंतिम सामन्यात भारताचा पराभव करत बांगला देशने सलग दुसऱ्यांदा आशिया कपवर नाव कोरले. (IND vs BAN u 19)
सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या बांगला देशला भारताने १९८ धावांवर रोखले. यावेळी भारतीय संघ सामन्यात आरामात विजयी होईल असे सर्वांना वाटत होते. परंतु, भारताच्या डावाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर आयुष म्हात्रे एका धावकरून तंबूत परतला. यानंतर वैभव सूर्यवंशी अवघ्या ९ धावांवर बाद झाला. आंद्रे सिद्धार्थ आणि केपी कार्तिकेया यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, सिद्धार्थ २० आणि केपी २१ धावा करून माघारी फिरले.
यानंतर कर्णधार मोहम्मद अमान २६ धावा करून बाद झाला. हार्दिक राजनने २१ चेंडूत २४ धावा केल्या. त्याच्याशिवाय चेतन शर्मानं केलेल्या १० धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. (IND vs BAN u 19)
बांगला देशच्या गोलंदाजांची महत्वाची भूमिका
बांगलादेशचा कर्णधार अझीझुल हाकीम तमिम आणि इक्बाल हुसैन यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेत भारतीय संघाला अडचणीत आणले. या दोघांसह अल फहादने दोन विकेट्स घेतल्या. रिझान हुसैन आणि मारुफ यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
𝗕𝗢𝗪 𝗗𝗢𝗪𝗡 𝗧𝗢 𝗧𝗛𝗘 𝗖𝗛𝗔𝗠𝗣𝗜𝗢𝗡𝗦! 🏆
Presenting the winners of the #ACCMensU19AsiaCup 2024 – Bangladesh U19! 🇧🇩#ACC pic.twitter.com/l0VYQdPLRu
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 8, 2024
हेही वाचा :
- ॲडलेट कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १० विकेट राखून विजय
- वनडे मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात
- १६ वर्षांनी न्यूझीलंडमध्ये इंग्लंडने जिंकली कसोटी मालिका