महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील उर्वरित तीन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाने संघाची घोषणा केली. यामध्ये ऑस्ट्रेलियने संघात महत्वाचे बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाने सलामीजोडीत आणि गोलंदाजीत बदल केला आहे. मालिकेतील चौथा सामना मेलबर्न स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. (IND vs AUS)
ऑस्ट्रेलियाने संघात सलमीवीर नॅथन मॅकस्विनीच्या जागी युवा फलंदाज सॅम कॉन्स्टास याची निवड करण्यात आली आहे. तर जखमी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या जागी रिचर्डसनला संघात स्थान देण्यात आले आहे. यासोबत शॉन ॲबॉट आणि ब्यू वेबस्टर यांची संघात वर्णी लागली आहे. नॅथन मॅकस्किनीच्या जागी संघात वर्णी लागलेल्या सॅम कॉन्स्टास मेलबर्न कसोटीतून पदार्पण करणार आहे. त्याने कॅनबेरा येथे भारताविरुद्धच्या पिंक बॉल कसोटीच्या सराव सामन्यात शतक झळकावले होते. तर रिचर्डसनने तीन वर्षांहून अधिक काळानंतर कसोटी संघात पुनरागमन केले आहे.
मालिका बरोबरीत
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सध्या १-१ अशी बरोबरीत आहेत. मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने आघाडी घेतली होती. परंतु, शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. तर मालिकेतील पावसामुळे अनिर्णित राहिला. मालिकेत आता दोन सामने बाकी आहेत. (IND vs AUS)
ऑस्ट्रेलियन संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, जे रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.
JUST IN: Australia have added young gun Sam Konstas to a 15-player squad for the final two #AUSvIND Tests | @ARamseyCricket https://t.co/9P0hGCCqXw
— cricket.com.au (@cricketcomau) December 20, 2024
हेही वाचा :
- India U-19 : भारतीय मुलींचा संघ अंतिम फेरीत
- जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स स्पर्धा दिल्लीत
- बांगलादेशचा एकतर्फी मालिका विजय