Home » Blog » imran sentenced jail : इम्रानना १४ वर्षांची शिक्षा

imran sentenced jail : इम्रानना १४ वर्षांची शिक्षा

अल कादीर ट्रस्ट प्रकरणात पत्नी बुशराही दोषी

by प्रतिनिधी
0 comments
imran sentenced jail

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बिबिला यांना अल कादीर ट्रस्ट प्रकरणात दोषी ठरवले आहे. न्यायालयाने इम्रान खान यांना १४ वर्षाची तर पत्नी बुशरा बिबीना सात वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. त्यांच्यावर ट्रस्टमधील २० अब्ज सहा कोटी १७ लाख ७७ हजार रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. (imran sentenced jail)

रावळपिंडीतील अडियाला जेलमध्ये बनवलेल्या न्यायालयात कडक सुरक्षाव्यवस्थेत न्यायाधीश जावेद राणा यांनी हा निकाल दिला. इम्रान खान गेली १८ महिने अडियाला जेलमध्ये कैद आहेत. खटल्याच्या निकालानंतर बुशरा बिबिना न्यायालयातच अटक करण्यात आली. न्यायालयाने इम्रानना दहा लाखाचा तर बुशरा यांना पाच लाखाचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी सहा महिन्याची शिक्षा त्यांना भोगावी लागणार आहे.(imran sentenced jail)

पाकिस्तानमधील प्रमुख ‘दैनिक डॉन’च्या रिपोर्टनुसार, या खटला बहिया टाऊनमधील जमिनीच्या खरेदीविक्री संबंधित आहे. या प्रकरणात इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. हा व्यवहार इम्रान खान पंतप्रधान असताना झाला आहे. इम्रान आणि त्याची पत्नीवर बहिया टाऊन लिमिटेडमधून करोडो रुपये आणि शेकडो एकर जमिन मिळवली आहे. दोघांवरील आरोप शाबित झाल्याने त्यांना शिक्षा ठोठावली आहे.

२०२३ मध्ये इम्रान आणि बुशरा यांच्याविरोधात नॅशनल अकाउंटबिलिटी ब्युरोने अद कादिर युनिव्हर्सिटी ट्रसशी संबंधित भ्रष्टाचाराचा आरोप दाखल केला होता. काळ्या पैशाच्या माध्यमातून बहिया टाऊन आणि कराचीत जमिनीचे व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. (imran sentenced jail)

दरम्यान, या शिक्षेविरोधात अपिल दाखल करणार असल्याचे इम्रान यांच्यावतीने सांगण्यात आले. इम्रान यांना २०२३ मध्ये अटक करण्यात आली. त्यापासून माझ्यावरील सर्व आरोप निराधार आहेत, माझे राजकीय पुनरागमन टाळण्यासाठी विरोधकांनी हे कुभांड रचल्याचा आरोप इम्रान यांनी केला आहे. या निकालापूर्वी, खान यांच्यावर तीन स्वतंत्र दोषारोप ठेवण्यात आले होते. त्यामध्ये भ्रष्टाचार, देशाची गुपिते उघड करणे आणि विवाह कायद्याचे उल्लंघन असे हे आरोप आहेत. यात त्यांना अनुक्रमे १०, १४ आणि सात वर्षांची शिक्षा झाली आहे.(imran sentenced jail)

हेही वाचा :
 कोटीच्या खंडणीसाठी हल्ला

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00