Home » Blog » Imran Khan nomination: इम्रान खान यांचे नोबेलसाठी नामांकन

Imran Khan nomination: इम्रान खान यांचे नोबेलसाठी नामांकन

विविध आरोपांखाली खान आहेत तुरूंगात

by प्रतिनिधी
0 comments
Imran khan

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. मानवी हक्क आणि लोकशाहीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांचे हे नाकांकन करण्यात आल्याचे पाकिस्तान वर्ल्ड अलायन्स (पीडब्ल्यूए) ने म्हटले आहे.(Imran Khan nomination)

गेल्या डिसेंबरमध्ये पाकिस्तान वर्ल्ड अलायन्स (पीडब्ल्यूए)ची स्थापना झाली आहे. जे नॉर्वेजियन राजकीय पक्ष पार्टीएट सेंट्रमचे देखील आहेत, त्यांनी ७२ वर्षीय खान यांचे नामांकन जाहीर केले. (Imran Khan nomination)

इम्रान खान पाकिस्तानचा मुख्य विरोधी पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे संस्थापक आहेत. ऑगस्ट २०२३ पासून ते तुरुंगात आहेत.

” पार्टीट सेंट्रमच्या वतीने इम्रान खान यांचे नाव नोबेल शांतता पुरस्कारासाठी जाहीर करताना आनंद होत आहे. इम्रान खान यांना पाकिस्तानमध्ये मानवी हक्क आणि लोकशाहीसाठी योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांचे नाव नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले आहे,” असे पार्टीट सेंट्रमने रविवारी ‘एक्स’वर म्हटले आहे. (Imran Khan nomination)

२०१९ मध्ये, दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. यासाठी खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते.

दरवर्षी, नॉर्वेजियन नोबेल समितीकडे शेकडो नामांकने येतात. त्यानंतर ते आठ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रक्रियेद्वारे विजेत्याची निवड करतात, असे ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’ने वृत्त दिले आहे. (Imran Khan nomination)

अधिकाराचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराशी संबंधित एका प्रकरणात १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

खान यांना देशाला मिळालेल्या भेटवस्तू विकणे,  देशाची गुपिते उघड करणे आणि बेकायदेशीर विवाह यासंबंधी शिक्षा झाल्या होत्या. मात्र त्या रद्दर करण्यात आल्या आहेत.

एप्रिल २०२२ मध्ये अविश्वास प्रस्तावानंतर खान यांना सत्ता गमवावी लागली. त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. राजकीयदृष्ट्या हे आरोप करण्यात आल्याचे आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा :
महासागराचे आम्हीच एकमेव रक्षक

 एप्रिल ते जून सर्वांत उष्ण

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00