Home » Blog » student death: बर्थ डे पार्टी झाली आणि दुसऱ्या दिवशी…

student death: बर्थ डे पार्टी झाली आणि दुसऱ्या दिवशी…

आआयएमचा विद्यार्थी मृतावस्थेत आढळला

by प्रतिनिधी
0 comments
Student death

बेंगळुरू : मित्रांसोबत त्याने बर्थ डे पार्टी एन्जॉय केली. सगळेच आनंदात आणि उत्साहाच्या वातावरणात परतले. मात्र दुसऱ्या दिवशीच त्यांच्यासाठी हादरा देणारी बातमी आली. त्याचा मृतदेह वसतिगृहाच्या आवारात सापडला. (Student death)

नीलय कैलाशभाई पटेल असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगळुरू (IIM-B)मध्ये तो द्वितीय वर्षाचा पोस्ट-ग्रॅज्युएट प्रोग्राम (PGP) शिकत होता. तो मूळचा गुजरातचा. अलीकडेच एका फॅशन ई-कॉमर्स फर्ममध्ये त्याला नोकरी मिळाली होती.

शनिवारी सर्व मित्रांसोबत मित्रांसोबत त्याने वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर लगेचच रविवारी वसतिगृहाच्या आवारात तो मृतावस्थेत आढळला. त्यामुळे सगळेच हादरून गेले. त्यांच्या अकस्मात निधनाने कॅम्पसमध्ये शोककळा पसरली.(Student death)

सकाळी साडेसहाच्या सुमारास सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आली. वसतिगृहाच्या लॉनवर पटेल बेशुद्धावस्थेत आढळला. त्यांनी तातडीने वरिष्ठ कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता.

पार्टी झाल्यानंतर पटेल रात्री उशिरा आपल्या खोलीकडे जात असताना वसतिगृहाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून चुकून खाली पडला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष आहे. त्याच्या शरीरावर किरकोळ जखमा आढळल्या. मात्र गंभीर आणि संशयास्पद असे काहीही आढळले नाही.

हेही वाचा :
भ्रष्टाचार बाहेर काढणा-या पत्रकाराची छत्तीसगडमध्ये हत्या
कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर कोसळले, तिघांचा मृत्यू

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00