जम्मू : जम्मूच्या अखनूर भागातील सीमेजवळ लालिआली येथे मंगळवारी झालेल्या आयईडी स्फोटामध्ये लष्कराचे दोन जवान शहीद झाले. या स्फोटामध्ये तीन जवान जखमी झाले असून स्फोटानंतर लष्कराकडून या भागात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. (IED Blast)
लष्कराच्या व्हाइट नाइट कॉर्प्स या तुकडीकडून याविषयी माहिती देण्यात आली. सीमाभागामध्ये जवानांकडून गस्त घालण्यात येत असताना हा स्फोट झाला. मंगळवारी सकाळीच अखनूर भागामध्ये एक गंजलेला उखळी तोफगोळा निकामी करण्यात आला होता. नमनदार गावाजवळील प्रताप कालव्यामध्ये हा तोफगोळा असल्याचे स्थानिकांना आढळले. त्यांनी याविषयी प्रशासनाला माहिती दिल्यानंतर लष्कराने सुरक्षितरीत्या तो निकामी केला. (IED Blast)
सोमवारी लष्कर आणि पोलिसांनी काश्मीरच्या कुपवाडा भागात राबवलेल्या शोधमोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. कुपवाडातील कर्नाह तालुक्यातील बडी मोहल्ला अमरोही येथे हा शस्त्रसाठा होता. यामध्ये एक एके-४७ रायफल, एक मॅगझिन, एक सायगा एमके रायफ, एक सायका मॅकझिन आणि गोळ्यांचे १२ राउंड्स इतकी शस्त्रे होती. येथील एका खाद्यपदार्थांच्या दुकानामध्ये बॅगेत हा शस्त्रसाठा ठेवण्यात आला होता. याप्रकरणी, स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (IED Blast)
मागील आठवड्यामध्ये केरी विभागात दहशतवाद्यांकडून भारतीय लष्करावर गोळीबार करण्यात आला होता. त्याचप्रमाणे, पाकिस्तानी सैन्याच्या आठ सैनिकांनी सीमेपलीकडून भारतात घुसखोरीचा प्रयत्नही केला होता. हे आठही जवान भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरामध्ये मारले गेले असले, तरी या घटनेमुळे सीमाभागातील तुकड्यांनी सतर्कता वाढवली आहे. व्हाइट नाइट कॉर्प्स तुकडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या घटनेनंतर सीमेवरील छावण्यांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता.
Suspected Improvised Explosive Device blast reported in #Laleali in #Akhnoor Sector during a fence patrol resulting in two fatalities.
Own troops are dominating the area and search #operations are underway.
White Knight Corps salutes and pays tribute to the supreme sacrifice of…— White Knight Corps (@Whiteknight_IA) February 11, 2025
हेही वाचा :