Home » Blog » Ichalakaranji Extortion : बनावट दस्त करून बँकेला सव्वा बारा कोटीला गंडा

Ichalakaranji Extortion : बनावट दस्त करून बँकेला सव्वा बारा कोटीला गंडा

बँक अधिकारी, वकिलासह ९ जणांविरोधात गुन्हा

by प्रतिनिधी
0 comments

इचलकरंजी : प्रतिनिधी : बनावट दस्त, कागदपत्रे तयार करुन आणि तामीळनाड बँकेतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने मिळकतीवर १२ कोटी १८ लाख रुपयांचा बोजा टाकून फसवणूक केल्याप्रकरणी नामांकित वकिलासह ९ जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Ichalakaranji Extortion )

मारुती दत्तोबा निमणकर, प्रकाश मारुती निमणकर, राजेश मारुती निमणकर, ऋषिकेश राजेश निमणकर, अभिषेक राजेश निमणकर, अ‍ॅड. एस. एन. मुदगल, दत्तात्रय पी. म्हातुगडे, तामीळनाड बँकेचे तत्कालीन मॅनेजर जी गणेशकुमार (रा. शिवकाशी ब्रँच विरुद्धानगर), विद्यमान मॅनेजर विजयराजन राजमानिक्कम (मूळ रा. मदुराई) अशी त्यांची नांवे आहेत. या प्रकरणी अ‍ॅड. दिगंबर शंकरराव निमणकर (वय ७५ रा. राजाराम रोड) यांनी फिर्याद दिली आहे.(Ichalakaranji Extortion )

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी अ‍ॅड. निमणकर यांच्या मालकीची सिटी सर्व्हे क्र.१५८६४/४,१५८६६ व सिटी सर्व्हे क्र १५८६६/१ ते ९ अशी मिळकत आहे. तर मारुती निमणकर फिर्यादीचे चुलत भाऊ आहेत. या मिळकतीचे टी. पी. स्किम १, फायनल फ्लॉट नं. २५५ मधील पान क्र. ३ व उपसंचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या आदेशानुसार नमूद मिळकतीप्रकरणी अंतरिम स्थगिती दिली आहे.

असे असताना सन २०२२-२४ या कालावधीत नात्याने चुलत भाऊ असलेल्या संशयित मारुती निमणकर, मंगल टेक्स्टाईल व प्रकाश विव्हींग मिल्स्चे प्रोप्रा. प्रकाश निमणकर, मे. मारुती टेक्स्टाईल व राजेश टेक्स्टाईलचे प्रोप्रा. राजेश निमणकर, ऋषिकेश टेक्स्टाईलचे प्रोप्रा. ऋषिकेश निमणकर, अभिषेक टेक्स्टाईलचे प्रोप्रा. अभिषेक निमणकर यांनी अ‍ॅड. एस. एस. मुदगल, तामीळनाड बँकेचे तत्कालीन मॅनेजर जी. गणेशकुमार, विद्यमान मॅनेजर विजयराजन राजमानिक्कम यांना हाताशी धरुन चुकीच्या पध्दतीद्वारे संगनमताने १२ कोटी १८ लाख रुपयांचे कर्ज बनावट दस्त व कागदपत्रांद्वारे करुन घेतले. ही बाब लक्षात आल्यानंतर अ‍ॅड. दिगंबर निमणकर यांनी फसवणूक प्रकरणी नऊजणांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.(Ichalakaranji Extortion )

हेही वाचा :

निवडणूक काळात बदल्या केलेल्या २१५ पोलीस निरीक्षक पुन्हा पूर्ववत जागी!
कास, महाबळेश्‍वर, पाचगणीला ‘मे तेरी रानी, तू मेरा…’

 

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00