Home » Blog » ICC T-20 Team : आयसीसी संघाच्या कर्णधारपदी रोहित

ICC T-20 Team : आयसीसी संघाच्या कर्णधारपदी रोहित

जागतिक टी-२० संघात चार भारतीयांना स्थान

by प्रतिनिधी
0 comments
ICC T-20 Team

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शनिवारी जाहीर केलेल्या २०२४ च्या जागतिक क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी भारताच्या रोहित शर्माची निवड करण्यात आली. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने तब्बल १७ वर्षांनी टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले होते. आयसीसीच्या या संघात रोहितबरोबरच हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग या खेळाडूंनाही स्थान मिळाले आहे. (ICC T-20 Team)

रोहितने २०२४ मध्ये १६०.१६ च्या स्ट्राइक रेटने ३७८ धावा फटकावल्या. याच वर्षी त्याने टी-२० वर्ल्ड कपमध्ये ३ अर्धशतकांसह २५७ धावा केल्या होत्या. हार्दिकने २०२४ मध्ये ३५२ धावा करण्याबरोबरच १६ विकेटही घेतल्या. वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २० धावांत ३ विकेट घेतल्या होत्या. बुमराहने वर्ल्ड कपमध्ये ८ सामन्यांत १५ विकेट घेतल्या होत्या. या वर्ल्ड कपमध्ये स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. अर्शदीपने २०२४ या वर्षामध्ये १८ सामन्यांत ३६ विकेट घेतल्या आहेत. टी-२० वर्ल्ड कपमध्ये तो १७ विकेटसह सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत संयुक्तरीत्या अग्रस्थानी राहिला. (ICC T-20 Team)

भारताच्या या चौघांसह आयसीसी संघामध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या संघांमधील प्रत्येकी एक खेळाडू आहे. विशेष म्हणजे, २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपचे उपविजेते ठरलेल्या दक्षिण आफ्रिका संघातील एकाही खेळाडूस आयसीसीच्या संघामध्ये स्थान मिळवता आलेले नाही. शुक्रवारी आयसीसीने २०२४ चे कसोटी आणि वन-डे संघ जाहीर केले होते. (ICC T-20 Team)

आयसीसी टी२० संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग (सर्व भारत), ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), फिल सॉल्ट (इंग्लंड), बाबर आझम (पाकिस्तान), निकोलास पूरन (वेस्ट इंडिज), सिकंदर रझा (झिम्बाब्वे), राशिद खान (अफगाणिस्तान), वनिंदू हसरंगा (श्रीलंका).

हेही वाचा :

मॅडिसन कीज् अजिंक्य

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00