पुणेः राज्यात महायुतीला अभूतपूर्व बहुमत मिळाले असले, तरी ‘ईव्हीएम’विरोधात मोठे आंदोलन उभे राहत आहे. अनेक ठिकाणी पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी पैसे जमा केले आहेत. अनेक गावात मतदार आणि मतदानाची संख्या जुळत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. राज्यात ‘ईव्हीएम’विरोधात रान पेटत असतानाच दुसरीकडे पुण्यात ९५ वर्षींय समाजसेवक बाबा आढाव यांनी या सर्व प्रकाराविरोधात आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे.
‘ईव्हीएम’च्या घोटाळ्यावर आढाव यांनी घाणाघात केला. ‘ईव्हीएम’चे निराकरण झाले पाहिजे. आम्हाला दाबायचा प्रयत्न करू नका. आम्हाला दाबायचा प्रयत्न केला तर असे होणार नाही. माझ्यासारखी माणसे मरण पत्करतील; पण दाबले जाणार नाही. आम्हाला हे स्वातंत्र्य असे नाही मिळाले. आम्हाला संघर्ष करावा लागला आहे. दोन तीन प्रश्न आहेत. त्याचे निराकरण करा. लोकसभा आणि विधानसभेतील मतदान आणि निकालात फरक कसा. याचा छडा लागला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
आम्ही शत्रू नाही. आपण मित्रच आहोत; पण प्रश्नाचे निराकरण झाले पाहिजे. मी नमस्कार म्हणत नाही. जिंदाबाद म्हणतो. दादा तुम्ही आलात, मी दोनदा जिंदाबाद म्हणतो. तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद देतो, असे आढाव दादांना म्हणाले. मला वाटते काही प्रयत्न निघाला नाही, तर आम्ही हे आंदोलन शांततामय मार्गाने पुढे नेईल. ते वाया जाऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ‘ईव्हीएम’मधील गैरप्रकार सिद्ध करण्याचे काम आपले आहे. घटनेला ७५ वर्षे होत आहेत. मी आत्मक्लेश सुरू केला आहे. हे सरकार कुणालाच जुमानत नाही. मतपेटीत जे झाले, त्याचा छडा लागलाच पाहिजे, याचे निराकरण झाले पाहिजे, अशी मागणी आढाव यांनी केली.
न्यायालयातून मार्ग निघत नाही, म्हणून जनआंदोलन केले जाते. त्याने केले म्हणजे आम्ही केले असे होत नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत. फक्त दडपू नका. तसा शब्द द्या. आतापर्यंत खूप दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आढाव यांनी सरकारवर केला. न्यायालयात न्यायाधीशांपेक्षा मला जनतेची न्यायबुद्धी महत्त्वाची आहे. आमचे आंदोलन चिरडले जाऊ नये. नाही तर चिघळले जाईल, चळवळी उभ्या करणे आमचे काम आहे. हे आंदोलन सुरू झाले. त्यात विधायक बाजू आहे. चळवळीच्या हक्काच्या बाजू आहेत. ते चिरडले जाऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सरकारी यंत्रणाचा गैरवापर
१९५२ पासून निवडणूका पाहिल्या; मात्र या वेळी सरकारी यंत्रणाचा खूप वापर झाला. तुम्ही सरकार आहात. तुम्ही पवार आहात मी काय बोलणार? याचे निराकण झाले पाहिजे. दाबायचा प्रयन्त केला तर लोक बाहेर पडणार, असा इशारा देत मी कधी दगड हातात घेतला नाही, शिव्या दिल्या नाहीत, मला अटक झाली. मी नमस्कार म्हणत नाही, मी झिंदाबाद म्हणतो, असे बाबा म्हणाले.