Home » Blog » Chhagan Bhujbal : मी कुणाच्या हातचे बाहुले नाही…

Chhagan Bhujbal : मी कुणाच्या हातचे बाहुले नाही…

दुखावलेल्या भुजबळांचा इशारा; नाशिकमध्ये बुधवारी शक्तिप्रदर्शन

by प्रतिनिधी
0 comments
Chhagan Bhujbal

नाशिक : मी कुणाच्या हातचे बाहुले नाही. कुणाच्याही सांगण्याने माघार घेईल, असा भुजबळ नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आपली भविष्यातील भूमिका आय असणार असा प्रश्न विचारला असता त्यांनी किशोरकुमार यांनी गायिलेल्या गाण्यातील “ जहाँ नहीं चैना, वहा नहीं रहना,” या ओळी उधृत केल्या. त्यामुळे भुजबळांच्या मनात नक्की काय सुरू आहे, यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. (Chhagan Bhujbal)

नव्या मंत्रिमंडळात भुजबळ यांना मंत्रिपद नाकारण्यात आले आहे. त्यामुळे ते नाराज आहेत. या नाराजीतूनच त्यांनी राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख अजित पवार यांच्यावर मंगळवारी टीका केली. माझ्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहे. तरीही आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे भुजबळ यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी भुजबळ नागपूरहून नाशिकला आले. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याविरोधात मी भूमिका घेतली. मी ओबीसी समाजाच्या बाजूने राहिल्यामुळे माझा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही. माझ्या मंत्रिमंडळातील समावेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होती. पण मला वगळण्यात आले. ते कुणाच्या सांगण्यावरून नाकारले याचा शोध आता मला घ्यावा लागेल, असे भुजबळ म्हणाले. (Chhagan Bhujbal)

एक गोष्ट नक्की आहे की प्रत्येक पक्षाचे प्रमुख याबाबत निर्णय घेतात. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस, शिवसेनेत एकनाथ शिंदे निर्णय घेतात. तसे साहजिकच आमच्या गटाचा निर्णय अजित पवार घेतात, असे सांगत भुजबळ यांनी अजित पवारांकडे अंगुलीनिर्देश केला.

बुधवारी नाशिकमध्ये दिशा ठरणार

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भुजबळ विजयी झाले आहेत. राज्यभरातील समर्थक बुधवारी नाशिकमध्ये जमणार असून सर्वांशी चर्चा करून ते पुढील वाटचाल ठरवतील, असा इशारा देत भुजबळ यांनी शक्तिप्रदर्शनासह दबावतंत्र अवलंबण्याचे संकेत दिले. मंत्रिपद न मिळाल्याचे मला दु:ख नाही. पण पक्षाकडून सातत्याने अवहेलना होते, याचा त्रास होतो, असे ते म्हणाले.

ते म्हणाले, ‘त्यांनी (अजित पवार) मला लोकसभा लढवण्यास सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही तसे सांगितले. मी सर्व तयारी पूर्ण केली पण महिना उलटला तरी त्यांनी माझे नाव घोषित केले नाही. त्यामुळे मीच लोकसभा न लढण्याचा निर्णय घेतला. मला राज्यसभेवर जायचे होते, तेव्हा विधानसभेची निवडणूक लढवावी, असे सांगण्यात आले. मला आठ दिवसांपूर्वी राज्यसभेची ऑफर आली होती, ती मी नाकारली. एकदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मी राज्यसभा कशी स्वीकारू? मी राजीनामा कसा देऊ शकतो? हा माझ्या मतदारांचा विश्वासघात नाही का? मी एक-दोन वर्षांनी राज्यसभेवर जाईन, पण आता नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. (Chhagan Bhujbal)

“आम्ही भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दर्शवली आहे,” या प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावर “मला त्यांना विचारायचे आहे की, मी तुमच्या हातातील बाहुले आहे का? तुम्ही मला वाटेल तेव्हा राज्यसभेवर जायला ण्यास सांगता, तुम्हाला वाटेल तेव्हा बसायला सांगा, वाटेल तेव्हा उभे राहायला सांगा,” असा संताप भुजबळ यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00