मुंबई : मानवी तस्करी आणि व्हिसा मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर केल्याच्या संशयावरून एका कथित प्राध्यापकाला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. संबंधित प्राध्यापकाने आपण हरियाणातील एका खासगी विद्यापीठात असल्याचा दावा केला आहे. तसेच विद्यार्थी देवाण-घेवाण कार्यक्रमांतर्गत पंजाब आणि हरियाणाच्या सातजणांना ब्रिटनला घेऊन जात होतो, असे त्याने पोलिसांन सांगितले. (Human trafficking)
पोलिसांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हा मानवी तस्करीचा गुन्हा असल्याचे दिसून येते. सुरुवातीला पोलिसांनी सात तरुणांना ताब्यात घेतले होते, परंतु नंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना सोडण्यात आले. त्यापैकी तीन अल्पवयीन आहेत.
‘‘संशयित प्राध्यापकाने केलेल्या दाव्यानुसार तो हरियाणास्थित विद्यापीठाशी संबंधित आहेत की नाही याची आम्हाला पडताळणी करायची आहे. त्यांनी त्यांचे ओळखपत्र सादर केले आहे, परंतु त्याची सत्यता पडताळणे आवश्यक आहे,’’ असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
सहार पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून, हे प्रकरण नंतर चौकशीसाठी प्रॉपर्टी सेलकडे वर्ग करण्यात आले. (Human trafficking)
सोमवारी पहाटे १२.३० च्या सुमारास दोन तरुण मुंबई विमानतळावरील इमिग्रेशन काउंटरवर आले. नियमित प्रक्रियेनुसार पडताळणीसाठी त्यांनी पासपोर्ट आणि व्हिसा सादर केले. त्यांच्याकडे युकेचा व्हिजिट व्हिसा होता. त्यांनी काउंटरवर असलेल्या अधिकाऱ्याला, ते हरियाणा येथील एका विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी विनिमय कार्यक्रमासाठी त्यांच्या प्राध्यापकांसोबत लंडनला जाणार आहेत, असे सांगितले.
ते हरियाणातील कोणत्या खासगी विद्यापीठात, कोणत्या अभ्यासक्रमात शिकत आहेत आणि लंडनमधील कोणत्या विद्यापीठात जात आहेत असे काउंटरवरील अधिकाऱ्यांना त्यांना विचारले. मात्र या दोघांना समाधानकारक उत्तर देता आले नाहीत. अधिकाऱ्याने त्यांच्या वरिष्ठांना सूचना दिल्या. त्यांना इतर इमिग्रेशन काउंटरवर संशयित ‘प्राध्यापक’ आणि आणखी पाच तरुण दिसून आले. त्यांनीही लंडनला जात असल्याचे सांगितले. (Human trafficking)
चौकशी केली असता, या ‘‘प्राध्यापका’ने दावा केला की तो हरियाणा विद्यापीठात व्यावसायिक प्रमुख असलेल्या दोन सहकाऱ्यांच्या सांगण्यावरून काम करत होता. यापूर्वी, त्याने दिल्लीतील एका हॉटेलमध्ये बिट्टू नावाच्या एजंट आणि युकेमध्ये स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या सात तरुणांशी बैठक घेतली होती. बिट्टूने त्यांच्याकडून प्रत्येकी २० लाख रुपये घेतले होते. युकेमधील विद्यार्थी विनिमय कार्यक्रमाबद्दल खोटी माहिती सादर करून त्याने या गटासाठी व्हिसा मिळवला, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर हा ‘प्राध्यापक’ दिल्लीहून मुंबईला सात तरुणांना घेऊन आला. येथून हे सर्वजण जेद्दाहमार्गे लंडनला जाण्याच्या तयारीत होते.
हेही वाचा :