रोहतक : काँग्रेस कार्यकर्ती हिमानी नरवाल यांच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. झज्जरमधील खैरपूर गावातील रहिवासी असलेल्या तिचा फेसबुक फ्रेंड सचिन उर्फ धिल्लू (वय ३०) याने तिचा खून केल्याचे उघड झाले आहे. हरियाणा पोलिसांनी सचिनला अटक केली आहे. (Himani Narval)
हिमानी नरवाल या काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. हिमानींचे राहुल गांधी यांच्यासोबत फोटो व्हायरल झाले होते. त्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत सक्रीय होत्या. हरियाणातील काँग्रेसचे नेते हुडा यांच्या गटातील त्या सक्रीय कार्यकर्त्या होत्या. २२ वर्षीय हिमानी नरवाल यांचा मृतदेह एका झुडुपातील सुटकेसमध्ये सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. संशयित सचिन उर्फ धुल्लू याच्याशी हिमानींची दीड वर्षापूर्वी मैत्री झली होती. तो सात महिन्यापासून तिच्या विजयनगर येथील घरात वारंवार येत होता. हिमानीचे आई आणि भाऊ दिल्लीत राहतात. (Himani Narval)
संशयित सचिन हा विवाहित आहे. त्याला दोन मुले आहेत. न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. संशयितांकडून पोलिसांनी हिमानीचा मोबाईल, लॅपटॉप आणि दागिने जप्त केले आहेत. झज्जरमधील कानोंडा गावात मोबाईल दुरुस्तीच्या दुकानातून या मौल्यवान वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. (Himani Narval)
एक मार्च रोजी पोलिसांना हिमानीचा मृतदेह रोहतक दिल्ली महामार्गावरील सांपला बस स्टँडजवळील एका सुटकेसमध्ये मिळाला. या गुन्ह्याबद्दल रोहतक रेंजचे अतिरिक्त पोलिस महासंचालक कृष्ण कुमार राव यांनी माहिती दिली. २८ फेब्रुवारीनंतर तिच्या घरी झालेल्या भांडणानंतर सचिनने मोबाईल चार्जरच्या केबलने हिमानी नरवालची गळा आवळून हत्या केली. (Himani Narval)
दीड वर्षापूर्वी संशियत सचिन सोशल मीडियाच्या माध्यमातून हिमानींच्या माध्यमातून संपर्कात आला होता. तो गेले सहा ते सात महिने हिमानीच्या घरी वारंवार येत होता. २७ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता सचिन हिमानीच्या विजयनगर येथील घरी आला. रात्रभर तिच्यासोबत राहिला. दुसऱ्या दिवशी एका कारणांवरुन हिमानी आणि सचिनमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर भांडणात झाले. सचिनने हिमानीचे हात तिच्या दुपट्ट्याने बांधले आणि मोबाईल चार्जरच्या केबलने तिचा गळा आवळून खून केला.(Himani Narval)
त्यानंतर तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला. सचिनने तिचा मोबाईल्, लॅपटॉप आणि दागिने चोरले आणि झज्जरमधील कानोंदा गावातील एका मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात ठेवल्या. वस्तू ठेवल्यानंतर तो हिमानीच्या घरी परतला. २८ फेब्रुवारी रात्री तो रोहतकमधील विजयनगर येथील दिल्ली बायपाससाठी एका ऑटो रिक्षात चढला. तिथून तो सांपलासाठी बसमध्ये चढला. त्यातंर तो जवळजवळ ८० मीटर चालत गेला आणि सुटकेस झुडपात फेकून दिली असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा :
सुहागरात्रीच वधूचा मुलाला जन्म, पतीची झोप उडाली