Home » Blog » Heatwave : महाराष्ट्र तापला, अकोला ४१.३ अंश सेल्सियस

Heatwave : महाराष्ट्र तापला, अकोला ४१.३ अंश सेल्सियस

सांगलीत ३८.१ तर कोल्हापूरात ३६.५ अंश सेल्यियस

by प्रतिनिधी
0 comments
Heatwave

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्रात तापमानाचा पारा चांगलाच चढलाच असून होळीच्यादिवशी गुरुवारी राज्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला जिल्ह्यात झाली. अकोल्यात ४१.३ अंश सेल्सियन तापमान नोंदवले गेले. कडक ऊन आणि हवेत दमटपणा वाढल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ३६.५, सातारा ३७.९ तर सांगलीत ३८.१ सेल्सियसची नोंद झाली आहे. (Heatwave)

यंदा उन्हाळ्याची चाहूल लवकर लागली असून फेब्रुवारीच्या मध्यावरच उन्हाचे चटके जाणवू लागले आहे. मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा सुरवातीपासून जाणवू लागला आहे. होळीनंतर उन्हाळा सुरू होतो असा समज आहे पण होळीपूर्वीच उन्हाळ्याने आपले रुप दाखवले आहे. आज होळीच्या दिवशी राज्यात पारा चांगला चढला आहे. विदर्भात नागपूर पारा ४०.२ तर अकोल्याचा पारा राज्यात सर्वाधीक ४१.३ नोंदवला गेला. सोलापूरात ३९.४ तर पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येकी ३८.२ सेल्सियसची नोंद झाली. (Heatwave)

राज्यातील महत्वाच्या शहरातील तापमानाची नोंद अशी, मुंबई ३७.० सेल्सियस अंश, नागपूर ४०.२, पुणे ३८.२, औरंगाबाद ३८.२, नासिक ३८.७, कोल्हापूर ३६.५, सोलापूर ३९.४, रत्नागिरी ३८.४, सातारा ३७.९, सांगली ३८.१, मालेगाव ३८.५, जळगाव ३९.४, परभणी ३९.१, अकोला ४१.३. (Heatwave)

हेही वाचा :

‘बदलापूर’प्रकरणी एफआयआर का नाही?

अंतराळवीर सुनीता विल्यम्सचा परतीचा प्रवास सुरू होणार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00