Home » Blog » Heat wave: एप्रिल ते जून सर्वांत उष्ण

Heat wave: एप्रिल ते जून सर्वांत उष्ण

उष्णतेच्या लाटांचा तडाखा बसणार

by प्रतिनिधी
0 comments
Heat wave

नवी दिल्ली : देशात उष्णतेच्या लाटा सुरू होणार आहेत. विशेषत: एप्रिल ते जून या काळात भारतात तीव्र उन्हाळा असणार आहे. अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटा अनेक दिवस राहणार आहेत, असा इशारा भारतीय हवामान विभागाने सोमवारी (३१मार्च) दिला. मध्य आणि पूर्व भारतात तसेच वायव्य पठारी भागात अनेक दिवस तीव्र उष्णतेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. (Heat wave)

भारतीय हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, देशातील बहुतेक भागात सरासरीपेक्षा जास्त कमाल तापमान राहील. पश्चिम आणि पूर्व भारतातील काही प्रदेश वगळता हा अनुभव येणार आहे. येथे तापमान सामान्य असणार आहे. तथापि, बहुतेक प्रदेशांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. (Heat wave)

“एप्रिल ते जून या काळात उत्तर, पूर्व आणि मध्य भारत तसेच वायव्य भारतातील पठरी भागात नेहमीपेक्षा उष्णतेच्या लाटेचे जास्त दिवस असण्याची अपेक्षा आहे,” असे महापात्रा यांनी पीटीआयला सांगितले. साधारणपणे, या काळात भारतात उष्णतेच्या लाटेचे चार ते सात दिवस नोंदवले जातात.

अधिक धोका कोणत्या राज्यांना?

राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक आणि तामिळनाडूच्या उत्तरेकडील भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा धोका अधिक असण्याची शक्यता आहे.

पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशा यासारख्या काही राज्यांमध्ये १० ते ११ दिवस उष्णतेच्या लाटेचा धोका असू शकतो, असे महापात्रा यांनी सांगितले. (Heat wave)

एप्रिलमध्ये, भारतातील बहुतेक भागात कमाल तापमान नेहमीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे, तर काही अतिदक्षिण आणि वायव्य भागात सामान्य तापमान जवळपास असू शकते. वायव्य आणि ईशान्येकडील काही भाग वगळता देशातील बहुतेक भागात किमान तापमान वाढलेले राहील.

आरोग्याचे धोके

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारांना अतिदक्षतेचे आदेश दिले आहेत. उष्माघाताची प्रकरणे हाताळण्यासाठी रुग्णालये सुसज्ज ठेवण्याचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी, भारतात ५३६ उष्माघाताचे दिवस होते. विक्रमी उन्हाळा पाहिला. तो १४ वर्षातील सर्वाधिक उष्ण होता. या काळात ४१,७८९ उष्माघाताची संशयित होते. त्यात १४३ मृत्यू झाले.

विजेच्या मागणीत वाढत

वाढत्या तापमानामुळे, या उन्हाळ्यात विजेची मागणी ९-१०% वाढण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी ३० मे रोजी विजेची सर्वाधिक मागणी २५० गिगावॅट्स ओलांडली होती. ती नेहमीच्या अंदाजापेक्षा ६.३% जास्त होती. वाढत्या ऊर्जेच्या वापरामागे हवामान बदलामुळे वाढती उष्णता हे कारण आहे, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. (Heat wave)

एप्रिलमध्ये पाऊस एप्रिलमध्ये सामान्य पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. वायव्य, ईशान्य, पश्चिम-मध्य आणि द्वीपकल्पीय भारतातील काही भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. तथापि, केरळ आणि कर्नाटकच्या पश्चिम घाट प्रदेशात भूस्खलन होण्याची शक्यता तसेच एप्रिलमध्ये ईशान्य राज्यांमध्ये संभाव्य पुराचा इशाराही दिला आहे, महापात्रा यांनी दिला आहे.

हेही वाचा :
अणुऊर्जेतून शाश्वत ऊर्जा विकास

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00