Home » Blog » Hampi crime: हम्पीमध्ये परदेशी पर्यटक महिलेवर अत्याचार

Hampi crime: हम्पीमध्ये परदेशी पर्यटक महिलेवर अत्याचार

ओडीशातील एका पर्यटकाची हत्या

by प्रतिनिधी
0 comments
Hampi crime

हम्पी (कर्नाटक) : जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कर्नाटकातील हम्पी येथे एका परदेशी पर्यटक महिलेसह आणखी एका महिलेवर अत्याचार करण्यात आला. यावेळी प्रतिकार करणाऱ्या दुसऱ्या पर्यटकाची हत्या करण्यात आली. ही धक्कायद घटना गुरुवारी (६ मार्च)  रात्री ही घडली. या प्रकरणी मल्लेश आणि साई चेतन या दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.(Hampi crime)

कोप्पल जिल्ह्यातील अनेगुंडी येथे ही घटना घडली. या घटनेनंतर गंगावती ग्रामीण पोलिसांनी तीन अज्ञात पुरूषांविरुद्ध बलात्कार, दरोडा, हल्ला आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, दोन परदेशी पर्यटकांसह त्यांच्या रिसॉर्टमधील एक महिला गाईड आणि चार पर्यटकांचा गट नदीपलीकडे असलेल्या तुंगभद्रा कालव्याजवळ आराम करत होते. त्यावेळी तिघे हल्लेखोर तेथे आले. तिघेही हल्लेखोर कन्नड आणि तेलुगू बोलत होते आणि त्यांचे वय २० ते २५ वर्षे दरम्यान होते. (Hampi crime)

तक्रारदाराने म्हटले आहे की, हल्लेखोरांनी अमेरिकन पर्यटक डॅनियल पिटास (२३), महाराष्ट्रातील नाशिक येथील पंकज पाटील (४२) आणि ओडिशातील बिबाश (२६) या तिघांना कालव्यात ढकलले. त्यानंतर तिच्यासह इस्रायली महिलेवर अत्याचार केला. तिघांपैकी दोघे पोहत बाहेर आले. मात्र बिबाशला येता आले नाही. त्याचा कालव्यात बुडून मृत्यू झाला. शनिवारी पोलिसांनी कालव्यातून बिबाशचा मृतदेह ताब्यात घेतला. (Hampi crime)

कोप्पलचे पोलिस अधीक्षक राम एल अरसिद्दी म्हणाले, “हल्लेखोरांनी तिघांना कालव्यात ढकलले. त्यापैकी दोघे पोहून किनाऱ्यावर येण्यात यशस्वी झाले. हल्लेखोर शारीरिकदृष्ट्या खूपच आक्रमक होते. यामध्ये स्थानिक टोळीचा सहभाग असावा, असा संशय आहे.’’ (Hampi crime)

पर्यटक आणि महिला गाईड गुरुवारी रात्री तारे पाहण्यासाठी त्यांच्या स्कूटरवरून  सानापूर तलावाजवळील दुर्गाम्मा गुडी मंदिराजवळील तुंगभद्रा कालव्याच्या डाव्या तीरावर गेले होते. ते कालव्याच्या कडेला आराम करत होते, गिटार वाजवत होते आणि तारे पाहत होते. रात्री १०.३० च्या सुमारास, तीन पुरुष मोटारसायकलवरून आले. पर्यटकांकडे त्यांनी येथे जवळ कुठे पेट्रोल मिळेल का असे विचारले, त्यानंतर त्यांनी पैसे मागितले. नकार दिला तेव्हा त्या पुरुषांनी पर्यटकांवर हल्ला केला. त्यापैकी एकाने डॅनियल, पंकज आणि बिबाश यांना कालव्यात ढकलले आणि दोघींवर अत्याचार केला. त्यांच्याकडील  दोन मोबाईल आणि ९,५०० रुपये रोख घेऊन पळून गेले.

हेही वाचा :

बसमध्ये महिलांचे पहिले पाऊल ठरवले ‘बॅड लक’!

सोने तस्करीतील अभिनेत्रीचा ४५ वर देशांत प्रवास

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00