Home » Blog » Hadiya case :  वडील पाकिस्तानी, आई भारतीय, मुलगी पाकिस्तानी

Hadiya case :  वडील पाकिस्तानी, आई भारतीय, मुलगी पाकिस्तानी

उच्च न्यायालयाने मागितले केंद्राचे मत

by प्रतिनिधी
0 comments
Hadiya case  

चंदिगड : प्रतिनिधी : पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदिगडमधील उच्च न्यायालयात एक नवीन प्रकरण आले आहे. वडील पाकिस्तानी आहेत तर आई भारतीय आहे. मुलगी पाकिस्तानात जन्मली आहे. त्यामुळे मुलीच्या नागरिकत्वासंबधी न्यायालयाने केंद्र सरकारकडे मत मागितले आहे. (Hadiya case)

हादिया नावाची पाच वर्षाची मुलगी असून तिचे वडिल पाकिस्तानी आहेत तर आई भारतीय आहे. न्यायाधीश कुलदीप तिवारी यांच्यासमोर खटल्याचे काम सुरू आहे. हदियाचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला असल्याने ती भारतीय नागरिक नाही. त्यामुळे तिला भारतात राहण्याची परवानगी द्यायची का याबत केंद्राने मत विचारात घेतल्यावर न्यायालय निर्णय घेणार आहे. (Hadiya case)

हादियाची आई गुलफशा या भारतीय असून त्यांनी १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये एका पाकिस्तानी नागरिकाशी विवाह केला. मुस्लिम रितिरिवाजानुसार त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर गुलफशा यांनी भारतीय नागरिकत्व सोडले नाही. त्यांच्याजवळ भारतीय पासपोर्ट आहे. विवाहानंतर त्या पतीसमवेत राहिल्या. त्यानंतर त्यांचा तलाक झाला. तलाक झाल्यानंतर गुलफशा मुलगी हादियाला घेऊन भारतात परतल्या. (Hadiya case)

हादियाचा जन्म पाकिस्तानात

हादियाचा जन्म पाकिस्तानात झाला आहे. त्यामुळे ती पाकिस्तानी नागरिक आहे. ती पाच वर्षाची आहे. हादिया वयाने लहान असल्याने ती आईशिवाय राहू शकत नाही तर वडील पाकिस्तानात आहेत. ते हादियाचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. हादियाने आपल्या आईच्या मार्फत ३१ जानेवारी २०१५ ला विदेश मंत्रालयाकडे एक अर्ज केला. पण अधिकाऱ्यांनी या अर्जावर निर्णय घेतला नाही. त्यामुळे गुलफशा यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. (Hadiya case)

कोर्टात सुनावणी

न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी केंद्र सरकाकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल त्यपाल जैन यांनी न्यायालयात सांगितले की मुलीच्याबाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. पण लहान मुलींचे प्रकरण पाहता न्यायाधीश तिवारी यांनी केंद्राला आदेश दिले आहेत. केंद्र सरकारने सहानुभुतीपूर्वक विचार करुन तीन महिन्यात निर्णय द्यावा, असा आदेश दिला आहे. (Hadiya case)

हेही वाचा :

माधवी बूच यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश

जॉर्डन इस्त्रालय सीमेवरील गोळीबारात केरळची व्यक्ती ठार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00