Home » Blog » Green Card: ग्रीन कार्ड कायम वास्तव्याची हमी नव्हे

Green Card: ग्रीन कार्ड कायम वास्तव्याची हमी नव्हे

अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स यांचे वक्तव्य

by प्रतिनिधी
0 comments
Green Card

वॉशिंग्टन : ग्रीन कार्ड स्थलांतरितांना अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्याची हमी देत ​​नाहीत, असे वक्तव्य अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी केले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Green Card)

हमासशी संबंध असल्याचा आरोप करत महमूद खलील या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर व्हान्स यांनी हे वक्तव्य केले आहे.

ग्रीन कार्ड, म्हणजेच अमेरिकेत कायमस्वरूपी आणि अधिकृत स्थायी निवासाचा परवाना देणारे कार्ड. भारतीयांसह परदेशी नागरिकांना अमेरिकेत  वास्तव्याची आणि काम करण्याची परवानगी देते. असे असले तरी, ‘कायमस्वरूपी निवास’ म्हणजे आयुष्यभराची सुरक्षितता नाही, असे वक्तव्य व्हान्स यांनी केले आहे. (Green Card)

‘ग्रीन कार्डधारकाला अमेरिकेत अनिश्चित काळासाठी राहण्याचा अधिकार नाही,’ असे जेडी व्हान्स यांनी फॉक्स न्यूजवरील ‘द इंग्राहम अँगल’च्या होस्ट लॉरा इंग्राहम यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

‘हे मूलत: अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल नाही आणि केवळ माझ्यासाठीही नाही. ते राष्ट्रीय सुरक्षेबद्दल आहे, परंतु अमेरिकन जनता म्हणून आपण आपल्या राष्ट्रीय समुदायात कोणाला सामील करून घ्यायचे हे ठरवतो. ते अधिक महत्त्वाचे आहे,’ असे व्हान्स म्हणाले. (Green Card)

‘आणि जर परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रपतींनी ठरवले की ही व्यक्ती अमेरिकेत राहू नये, त्यांना येथे राहण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, तर त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, ते इतके सोपे आहे,’ असे ते म्हणाले.

गेल्या उन्हाळ्याच्या दरम्यान इस्रायल-हमास युद्धाविरुद्ध कोलंबिया विद्यापीठात निदर्शने करण्यात आली. त्यावेळी भाषण केल्याबद्दल महमूद खलील या पदवीधर विद्यार्थ्याला शनिवारी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. महमूद खलील ग्रीन कार्डधारक आहे. तो या विद्यापीठाचा पदवीधर आहे.

महमूद खलील प्रकरण

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने महमूद खलीलचे ग्रीन कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यावर ‘हमासशी संबंधित कारवायांचे नेतृत्व’ केल्याचा आरोप आहे. या दहशतवादी गटाने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी केलेल्या हल्ल्यामुळे युद्ध सुरू झाले. (Green Card)

त्याच्या अटकेनंतर ट्रम्प प्रशासनावर टीकेची झोड सुरू आहे. टीकाकारांकडून तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यात काही उजव्या राजकीय विचारसरणीच्या लोकांचाही समावेश आहे. या कारवाईमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर परिणाम होत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

खलीलवर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. शनिवारी न्यू यॉर्कमध्ये अटक करण्यात आली. लुईझियानामध्ये इमिग्रेशन कोठडीत ठेवण्यात आले आहे. खलीलच्या वकिलांनी म्हटले आहे की ट्रम्प प्रशासनाने त्यांना अटक आणि हद्दपारीसाठी लक्ष्य केले. कारण त्याने अमेरिकेच्या संविधानाच्या पहिल्या दुरुस्तीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणाचे समर्थन केले आहे. (Green Card) १९५२ मध्ये पारित झालेल्या अमेरिकन इमिग्रेशन अँड नॅशनॅलिटी अॅक्टच्या तरतुदीनुसार, जर परराष्ट्र सचिवांना असे वाटले की कोणत्याही स्थलांतरितांची देशात उपस्थिती अमेरिकन परराष्ट्र धोरणाला प्रतिकूल आहे, तर त्यांना हद्दपार केले जाऊ शकते. कायदातज्ज्ञांनी म्हटले आहे की, ही तरतूद अपवादात्मक परिस्थितीतच लागू केली जाते.

हेही वाचा :
पाच मुलींचा बाप त्यांनी निर्दयीपणे मारला!
सेलीब्रिटीसह सर्वसामान्य होळीत रंगले

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00