वंदूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार लगत असणाऱ्या नलवडे यांच्या शेतामध्ये गव्याचे दर्शन झाले. यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
यासीन नायकवडी यांना रविवारी (दि.८) मध्यरात्री नलवडे यांच्या शेतामध्ये गवा दिसला. त्याची माहिती त्यांनी सह्याद्री डिझास्टर रेस्क्यू फोर्सचे अध्यक्ष अनिल ढोले यांना याची माहिती दिली. त्यांनी गव्याच्या पायांचे ठसे पाहत तो तेथून करनूर गावाकडे आल्याचे निदर्शनास आले. अनिल ढोले यांनी तेथील शेतामध्ये पाहणी केली असता अनेक शेतामध्ये त्याच्या पायाचे ठसे आढळून आले. यासह गव्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान केल्याचे दिसून आले. करनूर परिसरात गव्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे. (Kagal)
सकाळी पाहणी केली असता, नलवडे फार्म हाऊस येथून गव्याने करनूर रोड क्रॉस केला असवा, असा अंदाज आहे. मागील वर्षी गव्यांचा कळप कागल येथे जाधव मळ्याजवळ आलेला होता. त्यापैकी हा एक असण्याची शक्यता आहे.
– अनिल ढोले, अध्यक्ष, सह्याद्री रेस्क्यू फोर्स
हेही वाचा :