Home » Blog » दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

Crime News : झारखंडमध्ये सरपंचाच्या मुलासह सहा जणांना अटक

by प्रतिनिधी
0 comments
Crime News

रांची; वृत्तसंस्था : झारखंडच्या पलामू जिल्ह्यात एका सरपंचाच्या मुलाने त्याच्या पाच साथीदारांसह सामूहिक बलात्कार केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी सरपंचाचा मुलगा आणि तीन साथीदारांना अटक केली. हे प्रकरण नौदिहा बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. आरोपी विक्रम पासवान (वय २६) याची आई मंजू देवी या करकटा पंचायतीची सरपंच आहे. विक्रमचे वडील रामबली पासवान हे पोलिस ठाण्याचे चौकीदार आहेत. (Crime News)

या सर्वांनी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला. दोन्ही मुली चुलत बहिणी आहेत. दसरा मेळा पाहून त्या घरी परतत होत्या. सरपंच आणि चौकीदाराच्या मुलाच्या सहभागामुळे दोन दिवस प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. गावात पंचायतही बसली; मात्र काही लोक पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले आणि रविवारी सायंकाळी हे प्रकरण पोलिस ठाण्यात नेले. पीडित मुलींनी विक्रम पासवान (वय २६), अरविंद सिंग (वय ३० रा. नवाडीह), मनदीप कुमार पासवान (वय २५), पप्पू कुमार पासवान (वय २६ रा. सरैडीह) आणि दोन अज्ञातांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१३ आणि १४ वर्षांच्या मुली दुर्गापूजेच्या निमित्ताने ११ ऑक्टोबरच्या रात्री सराईडीहमध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम पाहून त्यांच्या बहिणीचा मेहुणा राकेश भुईयांसोबत दुचाकीवरून घरी परतत होत्या. दरम्यान, चार दुचाकीवरून तरुणांनी त्यांचा पाठलाग केला आणि सलैया विद्यालयाजवळ अर्धा डझन तरुणांनी त्यांना घेराव घातला. तरुणांनी दोन अल्पवयीन मुलींना जवळच्या निर्जन जंगलात नेले. तिथे दोन्ही पीडित मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या सहा तरुणांनी दोन्ही अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला. घटना घडल्यानंतर सर्वांनी घटनास्थळावरून पळ काढला. अल्पवयीन पीडितेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून जंगलात जनावरे पकडणाऱ्या लोकांनी मुलीला त्यांच्या घरी नेले. जिथे त्यांना रात्रभर सुरक्षित ठेवण्यात आले होते. पीडित मुलगी सकाळी घरी पोहोचली. घरी आल्यानंतर पीडितेने तिच्या कुटुंबीयांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती नौदिहा बाजार पोलिस ठाण्यात दिली आहे.  (Crime News)

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00