Home » Blog » Gandhiji’s Statue desecrated : माथेफिरुकडून गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना

Gandhiji’s Statue desecrated : माथेफिरुकडून गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना

by प्रतिनिधी
0 comments
Gandhiji’s Statue desecrated

पुणे : प्रतिनिधी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार विद्यानगरी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात घडली. भगवी वेशभूषा केलेल्या माथेफिरुने गांधीच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर चढून कोयत्याने पुतळ्याचे डोके तोडण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी धाव घेत माथेफिरुला पकडल्याने अनर्थ टळाला. सूरज शुक्ला असे माथेफिरुचे नाव आहे. (Gandhijis Statue desecrated)

पुणे रेल्वे स्थानकाबाहेर महात्मा गांधी यांचा हातात काठी घेऊन चालत जात असलेल्या स्थितीतील पूर्णाकृती पुतळा आहे. रविवारी रात्री गोंधळ घालत संशयित सूरज शुक्ला गांधीच्या पुतळ्याचा परिसरात आला. त्याच्या हातात कोयता होता अशी माहिती पुढे आली आहे. कोयता घेऊन संशयित सूरज शुक्ला चबतुऱ्यावर चढला. त्याने हातातील धारदार शस्त्राने गांधीच्या पुतळ्यावर वार केले. यावेळी रेल्वे स्टेशनवरील सुरक्षा रक्षक आणि रेल्वे पोलिसांनी पुतळ्याकडे धाव घेतली. संशयिताने नुकसान करण्यापूर्वी रेल्वे पोलिसांनी त्याला धाडसाने ताब्यात घेतले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी संशयित सूरज शुक्लाला ताब्यात घेतले. त्याने असे कृत्य का केले? याचा शोध घेत आहेत. (Gandhijis Statue desecrated)

प्राथमिक माहितीनुसार सुरज शुक्ला हा मुळचा उत्तर प्रदेश वाराणसीचा आहे. नो नोकरीनिमित्त पुण्यात आला होता. तो रुद्राक्षांच्या माळा आणि धार्मिक पुस्तके विक्रीचे काम करतो. उत्तर प्रदेशातील कुंभमेळा संपल्यानंतर तो महाराष्ट्रात मुक्कामाला आला होता. काही दिवसापूर्वी सातारा जिल्हयातील वाई शहरात तो वास्तव्याला होता. त्याने अलिकडे शहाळे फोडण्यासाठी कोयता घेतला. तो वाईतून पुण्यात आला आणि त्याने पुतळ्याची विटंबना केली. सूरजच्या मनात गांधी यांच्याविषयी पूर्वीपासून द्वेष होता. रविवारी तो उफाळून आला. त्यानंतर सूरजने महात्मा गांधीच्या पुतळ्यावर हल्ला चढवल्याची माहिती पुढे आली आहे.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. तो कोणत्या संघटनेशी संबधित आहे का याचीही चौकशी सुरू आहे. रेल्वे पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. (Gandhijis Statue desecrated)  

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00