पुणे : प्रतिनिधी : पुण्यातील स्वारगेट बस अत्याचारातील प्रमुख संशयित दत्तात्रय गाडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गाडेच्या गावात पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवून त्याला अटक केली. दोन दिवस अन्नपाण्यावाचून लपून बसलेला गाडे नातेवाईकांच्या घरी भूक लागल्यामुळे आला होता. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी डॉग स्कॉडच्या मदतीने त्याला पकडले. गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली. (Gade arrested)
दरम्यान, पोलिसांनी गाडेला कोर्टासमोर हजर केले असता त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.
मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास संशयित गाडे यांने एका युवतीवर पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बसमध्ये अत्याचार केले होते. पिडित युवतीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयित गाडे याची ओळख पटली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या शोधासाठी दहा पथके नियुक्त केली होती पण तो सापडला नव्हता. (Gade arrested)
गुरुवारी (दि.२७) दुपारी संशयित गाडे शिरुर तालुक्यातील त्याच्या गुनाट गावातील ऊसात लपल्याची माहिती मिळाली. १०० पोलिसांनी तब्बल ५० तास सर्च ऑपरेशन राबवले. पोलिसांना ग्रामस्थांनीही मदत केली. ड्रोनसह डॉग स्कॉडच्या चार पथकाचा तपासात सहभाग होता. गुरुवारी मध्यरात्री उसात लपलेला दत्तात्र्य गाडे नातेवाईकांच्या घरी आला. तिथे त्याने मला प्रचंड भूक लागली आहे. काही तरी खायला द्या असे नातेवाईकांना सांगितले. नातेवाईकांनी त्याला खायला न देता पाण्याची बाटली दिली. यावेळी बोलताना दत्तात्रय गाडेने आपल्याला पश्चाताप झाला आहे. जे काही झाले आहे ते चुकीचे झाले आहे. पोलिसांकडे शरण जाणार आहे, असेही त्याने सांगितले. पाण्याची बाटली घेऊन तो निघून गेला. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधून गाडेची माहिती दिली. (Gade arrested)
पोलिसांना माहिती मिळताच ताबडतोब मध्यरात्री सर्च ऑपरेशन सुरू केले. पोलिसांच्या १३ पथके तैनात करण्यात आले. त्यांच्या सोबतीला डॉग स्कॉडही देण्यात आले. पोलिसांनी त्याला उसाच्या शेतातून ताबयात घेतले. दोन दिवस तो उसाच्या शेतात होता. तिथे रहात होता आणि झोपत होता. पुणे पोलिस, क्राईम ब्रॅंच आणि गुनाट गावच्या ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नाने गाडेला अटक झाली. अटक केल्यानंतर त्याला स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुण्यात आणल्यावर त्याला लष्कर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. त्यानंतर त्याची ससून रुग्णालयात तपासणी करण्यात आली.
हेही वाचा
मुलीचा मृत्यूशी, पालकांचा व्हिसासाठी संघर्षः सुप्रिया सुळे धावल्या मदतीला