नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय लष्कराने मध्यम-पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चार यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. भारतीय लष्करासाठी डीआरडीओ आणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज यांनी संयुक्तपणे ही क्षेपणास्रे विकसित केली आहेत. या चाचण्या ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावर करण्यात आल्या.(Flight tests)
बहु-कार्यात्मक रडार, कमांड पोस्ट, मोबाइल लाँचर सिस्टम आणि इतर उपकरणांचा यामध्ये समावेश आहे. या आर्मी वेपन सिस्टमने हाय-स्पीड एरियल लक्ष्यांवर चार ऑपरेशनल फ्लाइट चाचण्या घेतल्या.
“या क्षेपणास्त्रांनी थेट मारा करून हवाई लक्ष्यभेद केला. लांब पल्ल्याच्या, कमी पल्ल्याच्या, जास्त आणि कमी उंचीचे चार लक्ष्यभेद या क्षेपणास्रे अचूक भेदली. यामुळे या प्रणालीची कार्यक्षमता सिद्ध झाली,” असे संरक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.(Flight tests)
या शस्त्र प्रणालीच्या ऑपरेशनल स्थितीत उड्डाण चाचण्या घेण्यात आल्या. चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीने तैनात केलेल्या रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टमसारख्या रेंज उपकरणांद्वारे कॅप्चर केलेल्या उड्डाण डेटाद्वारे शस्त्र प्रणालीची कार्यक्षमता सत्यापित करण्यात आली.(Flight tests)
“डीआरडीओच्या मार्गदर्शनाखाली पूर्व आणि दक्षिण कमांडकडून भारतीय सैन्याने या चाचण्या केल्या. या चाचण्यांमुळे दोन्ही लष्करी कमांडची ऑपरेशनल क्षमता सिद्ध झाली आहे आणि दोन रेजिमेंटमध्ये शस्त्र प्रणालीच्या ऑपरेशनलीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे,” असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
यशस्वी उड्डाण चाचण्यांसाठी डीआरडीओ, भारतीय लष्कर आणि उद्योगांचे अभिनंदन करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “चार यशस्वी चाचण्यांमुळे महत्त्वाच्या रेंजवर लक्ष्य रोखण्याची शस्त्र प्रणालीची क्षमता पुन्हा स्थापित झाली आहे.”
Flight tests : ‘डीआरडीओ’च्या क्षेपणास्त्रांकडून अचूक लक्ष्यभेद
जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचण्या
26
previous post