नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारत पाकिस्तान सीमेवर लष्कराने पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घालून ठार केले. बुधवारी (२६ फेब्रुवारी) पहाटे ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तानी घुसखोर भारताच्या हद्दीत का शिरत होता याची चौकशी केली जात असल्याचे सीमा सुरक्षा दला (बीएसएफ)ने सांगितले. (Firing at border)
पाकिस्तानी रेंजर्सकडे निषेध नोंदवण्यात येणार आहे. दरवर्षी पाकिस्तानी दहशतवादी आंतरराष्ट्रीय सीमेवरुन भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करतात. त्याला सुरक्षा दले सतर्क प्रत्युत्तर देतात. सीमा सुरक्षा दलाचे जवान सीमेवर पहारा देत असताना आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयास्पद हालचाल दिसून आली. घुसखोराला जागेवर थांबण्यास सांगितले असता तो वेगाने हालचाल करू लागल्याने त्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले असे लष्कराने सांगितले. (Firing at border)
बीएसएफने वृत्तसंस्थेला सांगितले की, बुधवारी पहाटेच्या सुमारास पठाणकोट सीमावर्ती भागात बीओपी ताशपाटण येथे आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडताना एका घुसखोराला पाहिले. त्याच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या. तो आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडताना दिसला. सैन्याने त्याला जागेवरच थांबण्याचा आदेश दिला, पण तो पुढे जात राहिला. पुढील धोका ओळखून बीएसएफच्या जवानांनी घुसखोराला गोळ्या घालून ठार केले. घुसखोराची ओळख व हेतू तपासला जात असल्याचे सीमा सुरक्षा दलाने सांगितले. (Firing at border)
बीएसएफच्या सतर्क जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. घुसखोरीसंबंधी पाकिस्तानी रेंजर्सकडे तीव्र निषेध नोंदवला जाईल असे लष्काराकडून सांगण्यात आले. पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर एलओसीवर गोळीबार सुरू केल्यावर भारतानेही गोळीबार करुन प्रत्युत्तर दिले. त्यावेळी ही घटना घडली. (Firing at border) यापूर्वी आठ फेब्रुवारी रोजी राजौरीच्या केरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील जंगली भागातूत दहशतवाद्यांनी गस्ती पथकावर गोळीबार केला होता. त्याला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले होते. चार आणि पाच फेब्रुवारीच्या मध्यरात्री पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये भुसुरुंग स्फोटात नियंत्रण रेषेवर जाण्याचा प्रयत्न करणारे दहशतवादी मारले गेले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जम्मू आणि काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा जोर वाढल्यावर सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल कारवाई वाढवली होती. हिवाळा सुरू होण्यापूर्वी सुरक्षा दलाने ३० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
हेही वाचा :
सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा
कोल्हापूरसह ६० ठिकाणी सीबीआय छापे