महाराष्ट्र दिनमान डेस्क : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ चार पुरुषांनी घेतल्याचे उघड झाले आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी पात्र महिलांची तपासणी सुरू केल्यानंतर चार पुरुषांनी आपली नावे या योजनेतून वगळावी, असा अर्ज सरकारी अधिकाऱ्यांकडे केला आहे. या चार पुरुषांच्या बँक खात्यावर प्रत्येक नऊ हजार रुपये यापूर्वीच जमा झाले आहेत.( Fake Beneficiary)
हिंगोली जिल्ह्यातील औढा तालुक्यातील चार पुरुषांनी आपली नावे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळावी, अशी मागणी सरकारी अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरुपात केली आहे. या मागणीनंतर सरकारी अधिकारीही चक्रावले आहेत. चार पुरुषांनी नाव वगळण्यासाठी अर्ज केल्यानंतर त्यांची नावे या योजनेतून वगळली असल्याचे हिंगोली जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्यांनी सांगितले. महेश बागडे, गजानन काळे, रामराव काळे आणि शिवाजी बाडे अशी चौघांची नावे आहेत. चारही व्यक्तींच्या नावावर यापूर्वीच प्रत्येकी नऊ हजार रुपये जमा झाले आहेत. (Fake Beneficiary)
दरम्यान राज्य सरकारने या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या अर्जाची तपासणी सुरू केली आहे. त्यामध्ये जानेवारी अखेर पाच लाख महिलांना लाभ नाकारण्यात आला आहे. त्यामध्ये ६५ वर्षावरील महिला, नमो योजना, संजय गांधी निराधार योजना, ज्यांच्या घरी चार चाकी वाहने आहेत अशा महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात होते. पण योजनेचा अनेक महिलांनी गैरफायदा घेतला असल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या अर्जाची पडताळणी केली असता शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. (Fake Beneficiary)
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यावर महिलांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. राज्यातील जवळपास दोन कोटी ५२ लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरवल्या होत्या. पात्र महिलेच्या खात्यावर मासिक दीड हजार रुपये डिसेंबर अखेर जमा करण्यात आले आहेत.
हेही वाचा :