नागपूर : प्रतिनिधी : नागपूर हिंसाचारातील प्रमुख संशयित फहीम खान याच्या घरावर नागपूर महानगरपालिकेने बुलडोझर चालवत त्याचे घर जमिनदोस्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. फहीम खान हा मायनॉरिटीज डेमॉक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष आहे. सोमवारी (दि.२४) सकाळपासून कारवाई सुरू करण्यात आली. (Fahim Khan home)
मात्र, नागपूर पालिकेच्या कारवाईविरोधात फहीमच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर, तत्काळ सुनावणी करताना न्यायालयाने महापालिकेकडून सुरू असलेल्या पाडकाम कारवाईला स्थगिती दिली. अतिक्रमण कारवाईविषयी सुप्रीम कोर्टाच्या नव्या गाईडलाईनचे उल्लंघन होत असल्याचा दावा हायकोर्टात दाखल याचिकेतून करण्यात आला होता.
नागपूरमधील यशोधरानगर येथील संजयबाग कॉलनीतील घर बांधताना फहिम खान याने अतिक्रमण केले असून त्यावर महानगरपालिकेने कारवाई केली आहे. फहिम खान याने अंदाजे ९०० चौरस फुटाचे अनाधिकृत बांधकाम केले आहे, असे महानगरपालिकेचे म्हणणे आहे. अतिक्रमण हटवण्यापूर्वी फहिम खान याच्या कुटुंबाला नोटीस पाठवली होती. दोन दिवसापूर्वी फहिम यांच्या कुटुंबियांनी घरातील सर्व सामान हलवले आहे. सध्या त्याच्या घरात कोणीच नाहीत. फहिम याला ३० वर्षे लिजवर असलेल्या घरात अनधिकृत बांधकाम केले असल्याने महानगरपालिकेने कारवाई सुरू केली होती. (Fahim Khan home)
सोमवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात तोडकामास सुरुवात झाली. घराच्या कंपऊंड पाडल्यानंतर पहिल्या मजला बुलडोजरने पाडण्याचे काम सुरू झाली आहे. कारवाईच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घराकडे येणारे रस्ते बॅरेकेटस् लावून अडवण्यात आले होते. मात्र कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर पाडकाम थांबवण्यात आले. (Fahim Khan home)
मागील सोमवारी १७ मार्च रोजी नागपुरात औरंगजेबाच्या कबरीच्या प्रश्नावर हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचार म्होरक्या फहिम खानला याला अटक केली असून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हिसांचारात १०० हून अधिक संशयितांना अटक केली आहे. (Fahim Khan home)
हेही वाचा :
नितीश यांच्या इफ्तार पार्टीवर मुस्लिम संघटनांचा बहिष्कार
कुणाल कामरांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी तोडफोड