जयपूर : रस्त्यावर स्फोटांमागे स्फोट होत होत होते. एका पाठोपाठ एक वाहन पेट घेत होते. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे काळेकुट्ट लोट… त्यातून उठणाऱ्या किंकाळ्या नि ज्वाळात लपेटलेले काही लोक… जयपूर-अजमेर हायवेवरील भयंकर दृश्याने लोक भयभीत झाले होते. हायवेवर अत्यंत भयावह परिस्थिती होती. काय सुरू आहे तेच काही वेळ समजत नव्हते…, काही अंतरावरून हे दृश्य पाहणाऱ्याने ही हकीकत सांगितली. (Jaipur Blast)
शुक्रवारी सकाळी जयपूर-अजमेर महामार्गावर एलपीजी टँकरने अनेक वाहनांना धडक दिली. त्यामुळे एकामागोमाग एक स्फोट होत गेले. त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. ३५ हून अधिक जण जखमी झाले त्यापैकी १५ जण गंभीर आहेत. ३० हून अधिक वाहने खाक झाली. काळ्या धुराचे लोट आकाशात पसरले. (Jaipur Blast)
प्राथमिक माहितीनुसार, ज्या टँकरन इतर वाहनांना धडक दिली त्यात रसायन भरलेले होते. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये आग लागलेल्या वाहनांमधून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी २५ हून अधिक रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या. अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे.
घटनास्थळी एका माणसाला आगीने लपेटले होते. त्याच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला होता. दृश्य भयंकर होते, असे एका स्कूल व्हॅन चालकाने सांगितले. घटनास्थळी पोहोचलो, तेव्हा लोक सैरावैरा धावत सुटल्याचे पाहिले. अनेकजण मदतीसाठी हाक मारत होते. एका माणसाला आगीत जळताना पाहिले, असे या चालकाने पीटीआयला सांगितले. अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका तेथे होत्या, परंतु त्यांनाही घटनास्थळी पोहोचणे सुरुवातील अशक्य झाले होत.’ (Jaipur Blast)
दुसऱ्या साक्षीदाराने ‘एएनआय’ला सांगितले की, महामार्गावरील जवळपास दोनशे मीटरपर्यंतची लाइन आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आम्ही पहाटे साडेपाच वाजता उठलो तेव्हा स्फोटाचा आवाज ऐकू आला. ज्यांना बसमधून उडी मारता आली नाही ते जळून मेले.
त्याने सांगितले की, मी आणि माझा मित्र राजसमंद ते जयपूर असा प्रवास करत होतो. पहाटे साडेपाचच्या सुमारास आमची बस अचानक बंद पडली आणि आम्हाला मोठा स्फोट ऐकू आला. बसच्या आजूबाजूला सगळीकडे आग लागली होती…बसचा दरवाजा लॉक होता त्यामुळे आम्ही खिडकी तोडली आणि बसमधून उडी मारली. आमच्यासोबत आणखी ७-८ लोकांनी खिडकीतून उड्या मारल्या. एकापाठोपाठ एक स्फोट होत होते.
हेही वाचा :