Home » Blog » Esha Singh : एशा सिंगचा रौप्यवेध

Esha Singh : एशा सिंगचा रौप्यवेध

मनू भाकेर सहाव्या स्थानी, स्कीटमध्ये निराशा

by प्रतिनिधी
0 comments
Esha Singh

ब्युनॉस आयरिस : भारताची नेमबाज एशा सिंगने रविवारी आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये २५ मीटर पिस्टल महिला

गटात रौप्यपदकाची कमाई केली. भारताची ऑलिंपिक दुहेरी पदकविजेती मनू भाकेर या गटात सहाव्या स्थानावर

राहिली. दरम्यान, स्कीट प्रकारामध्ये पुरुष व महिला या दोन्ही गटांतून भारतीय नेमबाजांना अंतिम फेरी गाठण्यात

अपयश आले. (Esha Singh)

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकणाऱ्या २० वर्षीय एशाला रविवारी प्राथमिक फेरीत फारशी

चमकदार कामगिरी करता आली नव्हती. प्राथमिक फेरीअखेर ५७९ गुणांसह नवव्या स्थानी राहून तिने कसाबसा

अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. दुसरीकडे मनू मात्र प्राथमिक फेरीत ५८५ गुणांसह तिसऱ्या स्थानी होती.

अंतिम फेरीत मात्र, एशाने कामगिरीत कमालीची सुधारणा केली. या फेरीत ३५ गुण मिळवून एशाने रौप्यपदक

निश्चित केले. चीनच्या सून युजिएने ३८ गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर चीनचीच फेंग सिशुआन ३० गुणांसह

ब्राँझपदकाची मानकरी ठरली. मनूला अंतिम फेरीत केवळ २० गुण मिळवता आल्यामुळे तिला सहाव्या स्थानावर

समाधान मानावे लागले. (Esha Singh)

स्कीट प्रकारात पुरुष गटात भारताचा अनंतजीत सिंह नरुका प्राथमिक फेरीत ११६ गुणांसह २५ व्या स्थानी राहिला.

याच प्रकारात भावतेगसिंग गिल (११६) आणि गुरजोत खांगुरा (११५) हे भारतीय नेमबाज अनुक्रमे २७ व २८ व्या

स्थानी होते. महिला गटामध्ये भारताची राइझा धिल्लाँ ११६ गुणांसह अकराव्या स्थानी राहिली. भारताच्या गनेमित

सेखोंला (११४) चौदाव्या आणि दर्शना राठोडला (११२) सतराव्या स्थानावर समाधान मानावे लागले. (Esha Singh)

हेही वाचा :

 हितेश गुलियाचा सुवर्ण‘पंच’

बुमराह मुंबई संघात परतला

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00