काठमांडू : विमान आकाशात उंचीवर असताना एका इंजिनातून आगीच्या ज्वाला दिसू लागल्या पायलटच्या हे लक्षात येताच इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी मागण्यात आली. तोपर्यंत या थराराने प्रवाशांची गाळण उडाली होती. (Emergency Landing)
बुद्ध एअरलाइन्सच्या विमानाबाबत ही घटना घडली. नेपाळमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर (TIA) त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. बुद्ध एअरलाइन्सच्या बीएचए ९५३ या विमानाने चंद्रगडीकडे जाण्यासाठी उड्डाण केले. स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३७ वाजता ते त्रिभुवन येथून निघाले होते. विमानात ७२ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिनातून आगीच्या ज्वाला दिसू लागल्या. पायलटच्या ते लक्षात येताच ते काठमांडूकडे वळवण्यात आले, असे नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नागरी उड्डाण प्राधिकरणाने प्रसारित केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तेथे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.(Emergency Landing)
‘बुद्ध एअर’ने एक्सवर म्हटले आहे की, ‘विमान काठमांडूहून भद्रपूरला जाणार होते. त्याच्या इंजिनमध्ये तांत्रिक समस्या आढळून आल्यानंतर ते काठमांडूला परत वळवण्यात आले. सकाळी ११:१५ वाजता हे विमान त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. आमची तांत्रिक टीम सध्या विमानाची तपासणी करत आहे. प्रवाशांना दुसऱ्या फ्लाइटने भद्रपूरला पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे.
काठमाडौंबाट भद्रपुर उडान नं. 953, जहाज कल साईन 9N-AJS, मा दायाँ इञ्जिनमा प्राविधिक समस्या देखिएको हुँदा जहाजलाई पुनः काठमाडौं डाईभर्ट गरि 11:15 मा त्रिभुवन विमानस्थलमा सुरक्षित अवतरण गराईएको छ । जहाजलाई हाम्रा टेक्निकल टिमले चेकजाँच गरिरहेका छन् ।
यात्रुहरुलाई अर्को जहाजबाट…— Buddha Air (@AirBuddha) January 6, 2025
हेही वाचा :
आयडी स्फोट; आठ जवान शहीद
पत्रकार हत्येतील प्रमुख आरोपीस अटक