Home » Blog » Elephant agitated: रथयात्रेतील गोंगाटाने हत्ती बिथरला; एकजण जखमी

Elephant agitated: रथयात्रेतील गोंगाटाने हत्ती बिथरला; एकजण जखमी

by प्रतिनिधी
0 comments
Elephant agitated

अहमदाबाद : येथे सुरू असलेल्या रथयात्रेच्या मिरवणुकीदरम्यान एक नर हत्ती बिथरून बॅरिकेड तोडून अरूंद गल्लीत घुसला. यावेळी झालेल्या पळापळीत एकजण जखमी झाला. मिरवणुकीत झालेली गर्दी आणि आवाजामुळे हा हत्ती चिडला आणि त्याने बॅरिकेड तोडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Elephant agitated)

इतर दोन हत्तींवरील माहूतांनी या हत्तीचा पाठलाग केला आणि त्यावर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मिरवणूक नियोजित स्थळाकडे मार्गस्थ झाली, असे शहरातील कांकरिया प्राणीसंग्रहालयाचे अधीक्षक आरके साहू यांनी सांगितले. (Elephant agitated)

‘‘खाडिया परिसरातील एका अरुंद गल्लीत हत्ती घुसल्याने एक जण जखमी झाला. जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मिरवणूक नियोजनानुसार सुरळीतपणे सुरू पुढे जात आहे,’’ असे पोलिस उपायुक्त (नियंत्रण कक्ष) कोमल व्यास यांनी सांगितले.

शुक्रवारी (२७ जून) सकाळी अहमदाबादमध्ये भगवान जगन्नाथाची १४८ वी रथयात्रा सुरू झाली. वार्षिक उत्सवात हजारो भाविक सहभागी झाले होते.

४०० वर्ष जुन्या जगन्नाथ मंदिरापासून निघालेली ही भव्य मिरवणूक जुन्या शहरातून मार्गक्रमण करून रात्री उशिरा परत येणार आहे. (Elephant agitated)

या मिरवणुकीत १७ हत्ती, १०० ट्रक आणि ३० आखाडे (स्थानिक व्यायामशाळा) असतात. दिवसभरात ती १६ किमी अंतर पार करते.

या हत्तींपैकी फक्त एकच नर आहे, असे साहू म्हणाले. साहू यांच्याकडे या हत्तींची आरोग्य तपासण्याची आणि कार्यक्रमापूर्वी फिटनेस प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी असते.

“मिरवणूक खाडिया गेटवर पोहोचली तेव्हा मोठ्या आवाजात आणि शिट्ट्यांच्या आवाजामुळे नर हत्ती अचानक बिथरला. तो धावू लागला आणि तो मागे फिरला,” असे साहू यांनी सांगितले. दोन मादी हत्तींवरील माहूतांनी नर हत्तीचा पाठलाग केला आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवले, असे ते म्हणाले. (Elephant agitated)

एका व्हायरल व्हिडिओमध्ये, हत्ती बॅरिकेड तोडून गर्दीत घुसून एका अरुंद गल्लीत प्रवेश करताना दिसत आहे.

‘‘हत्तीणीला ट्रँक्विलायझरच्या मदतीशिवाय लगेचच नियंत्रणात आणण्यात आले. त्यानंतर नर आणि दोन मादी हत्तीणींना त्याच ठिकाणी बांधण्यात आले. थोड्या वेळापुरताच हा गोंधळ झाला. त्यांना या मिरवणुकीत आणण्यात येणार नाही,’’ असे साहू म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, कांकरिया प्राणीसंग्रहालयातील कर्मचारी, वन विभाग आणि पशुवैद्यकीय डॉक्टर हत्तींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ‘‘मिरवणुकीच्या मार्गावर ट्रँक्विलायझिंग गनसह तीन पथके तैनात करण्यात आली आहेत,‘‘ असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :
२५० नर्सिंग कॉलेजच्या परवानगीत गौडबंगाल : शरद पवार
हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूचा एकत्र मोर्चा  

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00