महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्याच्या विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजप नेते राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आभार मानले. २९ महिन्यांपासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त होते. यावेळी उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सभागृहाचे कामकाज पाहिले होते. परंतु, आता विधान परिषदेचे कामकाज काम राम शिंदे पाहणार आहेत. (Ram Shinde)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर महायुतीने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. यानंतर मत्रिमंडळाचा विस्तारही झाला. यावेळी ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर विधानसभा सभापतीपदी राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा निवड झाली. महाविकास आघाडीने विधान सभा आणि विधान परिषदेच्या निवडीत सहभाग घेतला नाही. त्यामुळे विधानसभेच्या सभापतीपदी राहुल नार्वेकर यांची निवड बिनविरोध निवड झाली. तर, विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची निवड करण्यात आली.
यानंतर राम शिंदे यांनी सभापती पदाची जबाबदारी स्वीकारताना सर्वांचे आभार मानले. यावेळी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर विरोधकांचे आभार मानले. (Ram Shinde)
कोण आहेत राम शिंदे?
२००९ साली कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. यानंतर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला होता. याआधी ते फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री (ग्रामीण) म्हणून जबाबदारी पार पाडली.
“महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणूक ”
—
सदर निवडणूकीसाठी मला अधिकृत उमेदवारी जाहीर केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री @narendramodi साहेब, देशाचे गृहमंत्री श्री @AmitShah साहेब, भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda जी, राज्याचे मुख्यमंत्री श्री…— Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@RamShindeMLA) December 17, 2024
हेही वाचा :
- नौदल स्पीड बोटच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू
- Amit Shah : अमित शाहांच्या वक्तव्याचे संसद, विधानसभेत तीव्र पडसाद
- निवृत्तीनंतर अश्विन भारतात दाखल