वॉशिंग्टन : अमेरिकेत महागाईने सर्वसामान्य त्रस्त होऊ लागले असून अंड्याचे दर गगनाला भिडले आहेत. एक डझन अंड्याचा दर ८७० रुपयेवर पोचला असून अंड्याची ड्रगप्रमाणे तस्करी सुरू झाली आहे. अमेरिकेच्या शेजारी मेक्सिको आणि कॅनड्यातून अंड्यांची तस्करी होऊ लागली आहे. (Eggs)
अमेरिकन राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ आणि अन्य अर्थनितीमुळे अमेरिकेत महागाई गगनाला भिडली आहे. किराणा सामानाच्या दरात वाढ झाली आहे. खासकरुन अंड्यांचे दर प्रचंड वाढले आहेत. अर्थकारण आणि बर्ड फ्लू या कारणामुळे अंड्यांच्या किंमती वाढल्या असून नागरिक मेक्सिको आणि कॅनडातून अंड्यांची तस्करी करु लागले आहेत. (Eggs)
अमेरिकेच्या सीमेवर अंड्यांचे क्रेट पकडले जात आहेत. विना परवाना चिकनशी संबधित पदार्थावर दंड आकारला जात आहे. ‘द वॉल स्ट्रीट’च्या एका रिपोर्टनुसार, काळ्या बाजारात अंडी सर्वात लोकप्रिय वस्तू झाली आहे. ऑक्टोबरमध्ये अमेरिका कस्टम एंड बॉर्डर प्रोटेक्शनने पक्षी आणि कोंबड्याशी संबधित ३७०० हून अधिक उत्पादने जप्त केली आहेत. ही संख्या ड्रगपेक्षा जास्त आहे. फेंटनाइल एक ड्रगचा प्रकार असून त्याची तस्करी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात होते. पण ड्रग्जपेक्षा अंड्यांची तस्करी वाढली आहे. (Eggs)
अमेरिकेतील अंड्यांचा वाढलेला दर
अमेरिकेत अंड्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. अनेक शहरात एक डझन अंड्याचा दर १० डॉलर (अंदाजे ८७०) पर्यंत पोचला आहे. मेक्सिकोत एक डझन अंड्यांचा दर दोन डॉलर इतका आहे. त्यामुळे मेक्सिकोत अंड्याचा दर कमी असल्याने सीमेवर अंड्याची तस्करी वाढली आहे. अमेरिकेत बर्ड फ्लू आणि अन्य आरोग्याच्या कारणावरुन अमेरिकेत कच्ची अंडी आयात करण्यास बंदी आहेत. (Eggs)
हेही वाचा :
सुनीता विल्यम्सची परतीची प्रतिक्षा समीप
विधान परिषदेसाठी भाजपचे तीन उमेदवार जाहीर