नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गेल्या १० वर्षांत देशभरात १९३ राजकारण्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यात बहुतेक विरोधी पक्षातील नेत्यांचा समावेश होता. या १९३ गुन्ह्यांपैकी फक्त दोनच प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. केंद्र सरकारनेच ही माहिती बुधवारी (२० मार्च) संसदेत दिली.(ED CASES)
खासदार ए. ए. रहीम यांनी विचारलेल्या प्रश्नावर ही माहिती सरकारने दिली.
ईडीने जे गुन्हे दाखल केले त्यांपैकी १३८ गुन्हे नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात (२०१९-२०२४) नोंदवले गेले.
सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१५ ते २०१९ या काळात मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील गेल्या चार वर्षांत ईडीने ४२ राजकारण्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.(ED CASES)
ईडी राजकारण्यांशी संबंधित अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांची चौकशी करत आहे, ज्यामध्ये बहुतेक विरोधी पक्षांचे आहेत.
केरळमधील सीपीएम खासदार ए.ए. रहीम यांनी राज्यसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली. गेल्या १० वर्षांत राजकीय नेत्यांविरुद्ध, त्यांच्या पक्षांविरुद्ध किती ईडीचे गुन्हे दाखल झाले, कोणत्या वर्षी हे गुन्हे दाखल झाले, ते कोणत्या राज्यांचे आहेत आणि अशा प्रकरणांमध्ये कितीजणांना शिक्षा झाली. किती जणांची निर्दोष सुटका झाली याची माहिती रहीम यांनी मागितली.(ED CASES)
अलिकडच्या काळात विरोधी नेत्यांविरुद्ध ईडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे का आणि ईडीच्या चौकशीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी केंद्राने काही सुधारणा केल्या आहेत का, याची माहितीही खासदार रहीम यांनी मागितली होती.
राजकारण्यांविरुद्ध ईडीने केलेल्या कारवाईसंबंधी राज्य किंवा पक्षनिहाय माहिती उपलब्ध नसल्याचे चौधरी यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, अंमलबजावणी संचालनालयाकडून “विश्वसनीय पुराव्यांच्या आधारे गुन्हे दाखल करून त्याचा तपास सुरू केला जातेा. यामध्ये राजकारण, धर्म किंवा इतर कोणत्याही आधारावर भेदभाव केला जात नाही.”.
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीस हे सुटाबुटातले `योगी`
हिंदुत्ववादी संघटनांचे आठजण शरण