जालना : येथील दिवंगत नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध उर्दू शायर कै. राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृत्यर्थ दिला जाणारा ‘दु:खी’ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार लासलगाव (नाशिक) येथील कवी-गीतकार प्रकाश होळकर यांना जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. (Kavita Purskar)
ना. धों. महानोर राज्य पुरस्काराचीही यावेळी घोषणा करण्यात आली. रेंदाळ (कोल्हापूर) येथील साहित्यिक रफीक सूरज यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे. १० हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. (Kavita Purskar)
येत्या गुढीपाडव्याला जालना येथे रविवारी ( ता.३०) सायंकाळी ‘कवितेचा पाडवा’ या गाजलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
शनिवारी (२२ मार्च) संयोजक अभय साहनी, विनीत साहनी, लेखिका, कवयित्री डॉ. संजीवनी तडेगांवकर, अनुभव प्रतिष्ठानचे सचिव पंडितराव तडेगांवकर यांनी पुरस्काराची घोषणा केली. (Kavita Purskar)
पुरस्कार वितरणानंतर निमंत्रित कवींची सुरेल काव्यमैफल रंगणार आहे. कार्यक्रमस्थळी चित्रप्रदर्शन असणार आहे.
होळकर आणि सूरज यांची साहित्य संपदा
पुरस्कार प्राप्त कवी-गीतकार प्रकाश होळकर यांनी कोरडे नक्षत्र, रानगंधाचे गारुड, या साहित्य कृतींसोबतच सर्जाराजा, टिंग्या, गोष्ट छोटी डोंगराएवढी, बाबू बँडबाजा, धूळमाती, टपाल, घाटी अशा तेरा चित्रपटांसाठी गीत लेखन केले आहे. तीन चित्रपटांतील गीत लेखनासाठी त्यांना राज्य पुरस्कार मिळाले आहेत. तर साहित्यिक समीक्षक रफिक सूरज यांनी रहबर कादंबरी, आभाळ, बेबस, पायाड हे कथासंग्रह, सोंग घेऊन हा पोर
` कवितासंग्रह, समीक्षाग्रंथांसह मुस्लिम लेखकांच्या मराठी ग्रंथसूची आदींचे लेखन केले आहे.
हेही वाचा :
विनोद कुमार शुक्ल यांना ‘ज्ञानपीठ’ जाहीर
विद्यापीठ नामांतरविरोधात कृतिशील लढाई