मंगळुरू : बेंगळुरू विमानतळावर दोन नायजेरियन महिलांना ७५ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह अटक करण्यात आली. त्यांच्याकडे ३७ किलोपेक्षा जास्त ड्रग्ज सापडले. कर्नाटकातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. एवढा मोठा ड्रग्ज साठा येथे पहिल्यांदाच पकडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. (drug seized)
बंबा फॅन्टा (३१) आणि अबीगेल अॅडोनिस (३०) अशी या महिलांची नावे आहेत या दोन महिला दिल्लीहून आल्या होत्या. विमानतळावर उतरताना त्यांच्या ट्रॉली बॅगांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी हे एमडीएमए सापडले. त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. यामध्ये कोणते स्थानिक नेटवर्क आहे का, याचा तपास पोलीस करणार आहेत, असे मंगळुरूचे पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी पत्रकारांना सांगितले. (drug seized)
या महिलांकडून चार मोबाईल फोन, पासपोर्ट आणि १८,००० रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
त्या दिल्लीत राहत होत्या. संपूर्ण भारतात एमडीएमए तस्करीत त्यांचा सहभाग होता. ड्रग्जची वाहतूक करण्यासाठी त्यांनी हवाई मार्गांचा वापर केला. त्यांनी गेल्या वर्षी मुंबईला सुमारे ३७ आणि बेंगळुरूला २२ वेळा प्रवास केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
फॅन्टा २०२० मध्ये बिझनेस व्हिसावर भारतात आली होती, तर अॅडोनिस २०१६ पासून येथे राहत आहे. या दोन्ही महिला गेल्या १-२ वर्षांपासून ड्रग्ज कार्टेलमध्ये सहभागी होत्या, असे अग्रवाल म्हणाले. (drug seized)
त्यांनी सांगितले की, सहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी मंगळुरूमध्ये हैदर अली नावाच्या एका व्यक्तीला १५ ग्रॅम एमडीएमएसह अटक केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. अधिक तपासाअंती पोलीस अधिकाऱ्यांना पीटर नावाच्या एका नायजेरियन नागरिकाची माहिती मिळाली त्याला बेंगळुरूमध्ये ६ किलो एमडीएमएसह अटक करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :
अमेरिकेत अंड्यांची तस्करी