Home » Blog » Dilbahar Win : ‘दिलबहार’, ‘जुना बुधवार ‘चे विजय

Dilbahar Win : ‘दिलबहार’, ‘जुना बुधवार ‘चे विजय

उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धा

by प्रतिनिधी
0 comments
Dilbahar Win

कोल्हापूर : प्रतिनिधी : उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत झालेल्या सामन्यात दिलबहार  तालीम मंडळाने संध्यामठ तरुण मंडळाचा  १-० अशा गोल फरकाने पराभव केला.  सयुंक्त जुना बुधवार पेठ तालीम मंडळाने झुंझार क्लबचा  २-०  अशा गोलफरकाने मात करत  पुढील फेरीत प्रवेश  केला.  उत्तरेश्वर तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरु आहे. (Dilbahar Win)

रविवारी सकाळी दिलबहार  तालीम मंडळ आणि  संध्यामठ तरुण मंडळ  या दोन संघांतील सामना चुरशीचा झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या .पण दोन्हीं संघाना  गोल करण्यात  अपयश आले . मध्यंतराला दिलेल्या अतिरिक्त वेळेत दिलबहारच्या शोएब बागवानने  गोल करत  संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. (Dilbahar Win)

उत्तरार्धातील खेळावर दोन्ही संघ चुरशीने गोल करण्याचे प्रयत्न करत होते. पण समन्वयाअभावी गोलमध्ये रूपांतर करू नाही शकले. एकमेव  गोलची आघाडी कायम ठेवत दिलबहारने सामना जिंकला. दिलबहारकडून  प्रथम भोसले, अजीज मोमीन ,सुशांत अतिग्रे, राहुल तळेकर यांनी तर संध्यामठकडून  स्वराज्य सरनाईक, संकेत व्हनागडे, अर्जुन साळोखे, कपिल साठे यांचा चांगला खेळ झाला. (Dilbahar Win)

 दुपारच्या सत्रातील  सामना संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम आणि झुंझार क्लब यांच्यात झाला. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघ चढाई करत होते. सामन्याच्या ३१ व्या मिनिटाला झुंझारच्या गोलक्षेत्रात झालेल्या गोंधळाचा फायदा घेत  विष्णू मनिकडंन याने  गोल करत  संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परतफेड करण्यासाठी झुंझारकडून  चढाया झाल्या. पण गोल मध्ये रूपांतर होऊ नाही शकले. मध्यंतरापर्यंत संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम संघ १-० असा  आघाडीवर राहिला . (Dilbahar Win)

 उत्तरार्धाच्या सुरवातीपासूनच  दोन्ही संघांकडून आघाडीसाठी पुन्हा जोरदार प्रयत्न सुरु झाले. ५५ व्या  मिनिटाला रविराज भोसलेच्या पासवर विष्णू मनिकडंन गोल नोंदवून करत  संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. जुना बुधवारकडून प्रेम देसाई, हर्ष जरग, रविराज भोसले, सचिन मोरे, रिंकू सेठ  यांनी चांगल्या चढाया केल्या. झुंझारकडून गोल फेडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले गेले.  त्यांच्या करणसिंह पाटील, केदार साळोखे, समर्थ नवले, शाहू भोईटे, संचित साळोखे यांनी केलेले प्रयत्न जुना बुधवारच्या बचावापुढे फोल ठरले. अखेर हा सामना संयुक्त जुना बुधवार पेठ तालीमने  २-० अशा फरकाने जिंकला. (Dilbahar Win)

सामनावीर: शोएब बागवान  (दिलबहार तालीम), रविराज भोसले (जुना बुधवार)

लढवय्ये खेळाडू: आशिष पाटील  (संध्यामठ), हर्षल चौगुले  (झुंझार क्लब )

सोमवारचा सामना :  खंडोबा  तालीम मंडळ  वि. उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, दुपारी ४.००वा. (Dilbahar Win)

हेही वाचा :

 हैदराबादचा झंझावाती विजय

सनरायझर्सची विक्रमांना गवसणी

न्यूझीलंडची विजयी आघाडी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00