Home » Blog » Deportation :…मग गुजरातचे लोक अमेरिकेत कसे?

Deportation :…मग गुजरातचे लोक अमेरिकेत कसे?

अमेरिकन विमान दिल्लीत का उतरवले नाही? : काँग्रेसचा सवाल

by प्रतिनिधी
0 comments
Deportation

महाराष्ट्र दिनमान डेस्क : अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या भारतीयांना घेऊन येणाऱ्या अमेरिकन लष्करी विमानाला दिल्लीत उतरण्यास केंद्र सरकारने का परवानगी दिली नाही. दिल्लीऐवजी अमृतसरमध्ये विमान का उतरवले? असा प्रश्न पंजाब काँग्रेसच्या आमदारांनी केला आहे. गुजरात मॉडेल इतके चांगले असताना गुजरातमधील अनेक लोक बेकायदेशीरपणे परदेशात का स्थायिक होत आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. बहुतांशी निर्वासित पंजाबमधील नव्हते तर गुजरात राज्यातील होते यावरही त्यांनी प्रकाश टाकला. (Deportation)

अमेरिकेत राहणाऱ्या बेकायदेशीर भारतीयांना घेऊन येणारे विमान काल, बुधवारी अमृतसर विमानतळावर उतरले. त्यामध्ये ३१ निर्वासित पंजाब राज्यातील, ३३ गुजरातमधील तर ३५ हरियाणा राज्यातील होते. उत्तर प्रदेशातील तीन तर महाराष्ट्रातील दोघांचा समावेश होता. गुजरातमधील जास्त निर्वासित असतानाही अमेरिकेचे लष्करी विमान दिल्लीऐवजी अमृतसरला उतरवण्याची परवानगी दिल्याबद्दल जालंदर कॅन्टचे काँग्रेसचे आमदार परगत सिंह यांनी टीका केली. (Deportation)

ते म्हणाले, पंजाबपेक्षा गुजरातसह इतर राज्यातील जास्त निर्वासित आहेत. जेव्हा पंजाब आंतरराष्ट्रीय उड्डाणांची मागणी करतो तेव्हा पंजाबला आर्थिक लाभ नाकारण्यासाठी फक्त दिल्ली विमानतळाला परवानगी दिली जाते. परंतु जेव्हा बदनाम करणारी कथा चालवण्याचा विचार येतो तेव्हा बहुतांशी निर्वासित गुजरात आणि हरियाणाचे असतानाही अमेरिकेचे निर्वासित भारतीयांचे विमान पंजाबमध्ये उतरते, असा आरोप त्यांनी ‘एक्स’ पोस्टवर केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या मुद्दावर मौन बाळगल्याबद्दल त्यांनी टीका केली आहे.

पंजाबमधील सामाजिक संघटना मित्तल सतलचे अध्यक्ष अजयपाल सिंग ब्रार म्हणाले की, सी-१७ सारख्या लष्करी विमानाचा वापर नागरी विमानापेक्षा पाच ते आठ पट महाग आहे. ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीच्या काही दिवस आधी वर्चस्व गाजवण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न होता. अमेरिकेतील भारतीयांना घेऊन येणारे निर्वासितांचे विमान दिल्लीऐवजी अमृतसरमध्ये उतरवण्यासाठी परवानगी देण्याच्या केंद्राच्या निर्णयावर त्यांनी टीका केली. केंद्राचा चेहरा वाचवण्यासाठी हा निर्णय होता, अशी खिल्लीही उडवली. ब्रार यांनी असा युक्तिवाद केला की अमेरिकन विमान राष्ट्रीय राजधानीत उतरले असते तर अमेरिकन प्रशासनाशी मजबूत संबंध असल्याचा दावा करणाऱ्या सरकारसाठी ते मोठे लाजिरवाणे ठरले असते. (Deportation)

पंजाबचे एनआरआय व्यवहार मंत्री कुलदीप सिंग धालीवाल म्हणाले, मी अमेरिकेतून आलेल्या तरुणांना भेटलो. ते दुबईतील एजंटांमार्फत अमेरिकेत गेले होते, असे बहुतांशजणांनी सांगितले. तिथे स्थलांतरीत झालेल्या भारतीयांच्या डोक्यावर हद्दपारी किंवा तुरुंगवासाची तलवार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांना पाठिंबा देणाऱ्या पंतप्रधान मोदींनी आता ही समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या मैत्रीचा वापर करावा. ही मैत्री गरजू भारतीय नागरिकांना मदत करु शकत नसेल तर त्याचा काय उपयोग, असा सवालही त्यांनी केला.

हेही वाचा :

अमेरिकेतून शंभरावर भारतीयांची पाठवणी

प्राध्यापिकेने बांधली विद्यार्थ्यांशी लग्नगाठ!

शेख मुजीबुर रहमान यांचे निवासस्थान पेटवले

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00