नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने जवळपास २६ वर्षांनी दिल्ली विधानसभेची सत्ता खेचून आणण्यात यश मिळवले. हा ऐतिहासिक विजय खेचून आणताना एकूण ७० जागांपैकी ४८ जागांवर भाजपने विजय संपादन केला. सत्ताधारी आम आदमी पक्षाचे २२ उमेदवार विजयी झाले. ‘आप’ने या निवडणुकीत भाजपशी निकराची झुंज दिली. मात्र त्यांचे पानिपत झाले. (Delhi result )
निवडणुका घोषित झाल्यापासून अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत भाजपने आपकडून सत्ता खेचून आणल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भाजपच्या उमेदवाराने धूळ चारली. या हायप्रोफाइल लढतीत भाजपच्या परवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघात ४,०८९ मतांनी पराभव केला. तर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया जानपुरा विधानसभा मतदारसंघातून ७०० मतांनी पराभूत झाले. भाजपच्या तरविंदर सिंग मारवा यांनी त्यांचा पराभव केला.(Delhi result )
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतमोजणीदरम्यान सुरुवातीपासूनच सत्ताधारी ‘आप’ला मोठा फटका बसत असल्याचे चित्र दिसत होते. सकाळी ११ च्या सुमारास भाजप ४७ जागांवर आघाडीवर होता. तर सत्ताधारी आम आदमी पक्षाने २२ जागांवर आघाडी घेतली होती. काँग्रेसचे अस्तित्व फारसे दिसत नाही. ते तसेच राहिले. भाजप बहुमताच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट होताच या पक्षात आता मुख्यमंत्रिपदाच्या नावाची चर्चा सुरू झाली. (Delhi result)
केजरीवाल यांचा पराभव करणारे परवेश वर्मा म्हणाले, ‘हा असत्यावर सत्याचा विजय आहे, नौटंकीवर सु:शासन आणि विकासा’चा विजय आहे. विजयाचे श्रेय दिल्लीच्या जनतेचे आहे. हा विजय दिल्लीतील जनतेचा विजय आहे. मतदारांनी विश्वास टाकल्याबद्दल आभार!
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी कालकाजीमध्ये भाजपच्या रमेश बिधुरी यांचा ३,००० पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. आपच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी आतिशी यांनी राखलेली ही जागा आहे. कालकाजीच्या लोकांचे आभार मानताना, आतिशी यांनी मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मनगटशाही आणि हिंसाचार यांसारखी आव्हाने असतानाही त्यांच्या समर्थकांनी तळागाळात जाऊन जे प्रयत्न केले, त्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.
दिल्लीच्या जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारलेला आहे. भाजपचे मन:पूर्वक अभिनंदन. भाजप दिल्लीकरांच्या अपेक्षांना खरा उतरले.
– अरविंद केजरीवाल
ही विजयाची वेळ नाही, ही लढाईची वेळ आहे.
– आतिशी, मुख्यमंत्री आणि आप उमेदवार
#दिल्ली_के_दिल_में_मोदी https://t.co/VfbfCpzSyg
— Office of Amit Shah (@AmitShahOffice) February 8, 2025
हेही वाचा :